London Sikh Restaurant Attack : हलाल मांस विकण्यास नकार दिल्यावर पाकिस्तानी मुसलमानांकडून शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटवर आक्रमण  

  • लंडन (ब्रिटन) येथील घटना

  • पोलिसांकडून मुसलमानांना अटक करण्याऐवजी मालकालाच केली अटक

लंडन (ब्रिटन) – येथील हॅमरस्मिथ परिसरात हरमन कपूर यांच्या ‘रंगरेज’ या हॉटेलमध्ये त्यांनी हलाल मांस विक्री न करण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून येथील १०० हून पाकिस्तानी मुसलमानांच्या गटाने आक्रमण केले. विशेष म्हणजे लंडन पोलिसांनी या प्रकरणात हरमन कपूर यांनाच अटक केली.

हलाल मांस विकण्यासाठी दबाव !

सुटकेनंतर हरमन कपूर म्हणाले की,

१. १४ मार्च या दिवशी त्यांनी रेस्टॉरंटवर एक फलक लावून ‘रेस्टॉरंटमध्ये हलाल मांस मिळणार नाही’, असे लिहिले. यावरून वाद झाला. फलक लावल्यानंतर रेस्टॉरंटवर पाकिस्तानी लोकांची गर्दी जमा झाली. येथे तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्यावरही आक्रमण करण्यात आले. यानंतर स्वतःकडील कृपाणद्वारे (धार्मिक शस्त्राद्वारे) स्वतःचा बचाव केला. या वेळी मुसलमानांनी माझ्या घरावरही आक्रमण केले.

२. या वेळी पोलिसांनीही मुसलमानांना साथ दिली. आरोपींना अटक करण्याऐवजी उलट मलाच अटक केली; पण चौकशीनंतर सोडून दिले. पोलिसांनी अटकेचे कारण आक्रमण करणार्‍या मुसलमानांना शस्त्र दाखवणे असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, लंडनमध्ये शस्त्र दाखवणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

३. शीख गुरूंनी आत्मसंरक्षणासाठी कृपाण समवेत बाळगण्यास सांगितले आहे. मी माझ्या कुटुंबाला आक्रमणकर्त्यांपासून वाचवले आहे. कुणावरही आक्रमण केले नाही. वर्ष २०२३ पासून खलिस्तानी आणि मुसलमान यांचे मी लक्ष्य आहे. पोलिसांनी मला अटक केली; कारण माझे नाव खान नाही. मला हलाल मांस विकण्यासाठी भाग पाडले जात आहे. माझा व्यवसाय वाचवण्यासाठी मला जगभरातील शिखांकडून साहाय्य मागावे लागत आहे.
दुसरीकडे विरोध करणार्‍या मुसलमानांनी सांगितले की, कपूर यांनी त्यांना आक्रमण  करण्यासाठी चिथावले, द्वेषपूर्ण भाषण दिले, मुसलमानांवर टीका केली आणि कृपाण दाखवून धमकी दिली.

रेस्टॉरंट बंद करण्याची घोषणा

१४ मार्च या दिवशी मुसलमानांच्या आक्रमणामुळे आणि अटकेनंतर हरमन कपूर यांनी १५ मार्च या दिवशी त्यांचे रेस्टॉरंट बंद करण्याची घोषणा केली. यानंतर ब्रिटनमध्ये चर्चा चालू झाली की, ‘एका व्यावसायिकाला त्याच्या रेस्टॉरंटचा मेन्यू निवडण्याचाही अधिकार नाही का ?’ हे सूत्र आता ब्रिटनमध्ये एक मोठा प्रश्न बनला आहे. लोक सामाजिक माध्यमांवर विचारत आहेत की, पोलिसांनी जमावाला सोडून मालकाला का अटक केली ?

वर्ष २०१० मध्ये उघडलेले होते ‘रंगरेज’ रेस्टॉरंट

हरमन कपूर यांनी अफगाणिस्तानमधून येऊन वर्ष २०१० मध्ये रंगरेज रेस्टॉरंट चालू  केले. पहिल्या दिवसापासूनच हलाल मांस न विकण्याचा त्यांनी निश्चय केला. हरमन यांनी सांगितले की, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मांस मिळते; पण ते झटका पद्धतीचे असते. शीख धर्मीय असल्याने त्यांनी कधीही हलाल मांस विकले नाही. वर्ष २०२३ मध्ये हलाल मांस न विकण्याचा फलक लावल्यावर छोटे वाद चालू झाले. त्यानंतर रेस्टॉरंटवर अंडी फेकण्यात आली. कपूर यांचे म्हणणे आहे की, असे घडले कारण त्यांनी नेहमीच खलिस्तानचा विरोध केला.

हलाल आणि झटका मांस यांतील भेद

हलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो.

संपादकीय भूमिका 

ब्रिटनचे आता इस्लामी देशात रूपांतर होत आहे, त्याचे हे एक छोटेसे उदाहरण ! ज्या प्रमाणे इस्लामी देशांतून अन्य धर्मियांना पलायन करावे लागते, तसेच आता ब्रिटनमध्ये होणार आहे, हे अन्य धर्मियांनी लक्षात घ्यायला हवे !