
‘सध्याच्या युगात अनेक साधक केवळ काही घंटे साधना म्हणून नामजप, ध्यान इत्यादी करतात आणि दिवसाचा बहुतांश वेळ दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट पहाण्यात, तसेच भ्रमणभाष अन् ‘सोशल मिडिया’ यांचा वापर करण्यात घालवतात.

संतांच्या सत्संगात असलेले चैतन्य आणि सात्त्विकता यांमुळे सत्संगातील व्यक्तीची आध्यात्मिक पातळी तात्कालिक कालावधीसाठी वाढते. त्यामुळे तिला आध्यात्मिक अनुभूती येते. व्यक्तीला सतत काही काळ संतांच्या सत्संगातील चैतन्य मिळाल्यामुळे आणि तिच्या साधनेच्या प्रयत्नांमुळे तिची आध्यात्मिक पातळी टिकून रहाते. याउलट रज-तमप्रधान चित्रपट आणि दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे, ‘सोशल मिडिया’चा वापर करणे इत्यादी गोष्टी करण्यात दिवसातील अधिकांश वेळ घालवल्यास व्यक्तीची आध्यात्मिक पातळी तात्कालिक कालावधीसाठी घटते. त्या वेळी साधकाच्या न्यून झालेल्या आध्यात्मिक पातळीचा अपलाभ घेऊन वाईट शक्ती साधकावर तीव्र आक्रमणे करतात आणि त्याला रुग्णाईत करतात. सतत काही काळ व्यक्तीवर वाईट शक्तीचे आक्रमण होणे आणि चित्रपट अन् दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम पहाणे, ‘सोशल मीडिया’चा वापर करणे इत्यादींतून प्रक्षेपित होणारे रज-तम यांमुळे शेवटी व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीत नेहमीकरता घट होते.
‘असे होऊ नये’, यासाठी साधकाने दिवसभर प्रार्थना, येता-जाता नामजप आणि भावजागृतीचा प्रयोग करणे, तसेच कृतज्ञता व्यक्त करणे, अशा विविध माध्यमांतून ईश्वराच्या सत्संगात, म्हणजे अनुसंधानात असणे महत्त्वपूर्ण आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.१.२०२६, वेळ : सकाळी १०.०२ वाजता आणि कालावधी : १० सेकंद)
|
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !