राजस्थान, देहली आदी ठिकाणी करायचे होते स्फोट !

अंबाला (हरियाणा) – येथे विशेष अन्वेषण पथकाने ३ तरुणांना अटक करून त्यांच्याकडून २ किलो आर्डीएक्स स्फोटके जप्त केली होती. या तरुणांच्या चौकशीत ‘ही स्फोटके पाकिस्तानमधून पाठवण्यात आली होती. यांद्वारे राजस्थान, देहली आदी ठिकाणी बाँबस्फोट घडवण्यात येणार होते’, अशी माहिती मिळाली. पाकिस्तानमधील कुख्यात गुंड आणि आतंकवादी शहजाद भट्टी याच्या सूचनेवरून ड्रोनद्वारे अमृतसर येथे आर्डीएक्स पाठवण्यात आले होते. (अमृतसर येथे ड्रोनद्वारे आलेले आर्डीएक्स कह्यात घेणार्या आणि तेथून अंबाला येथे पाठवणार्या सर्वांना अटक करून त्यांनाही फाशीच दिली पाहिजे ! – संपादक)
🚨 Ambala (Haryana): RDX seized by STF – Accused Akbar, Ali & Janveer have been booked under the UAPA.
Investigations reveal that attacks were being planned in Rajasthan, Delhi and other locations.
Terror conspiracies targeting India must be dealt with firmly. Such… pic.twitter.com/wj5FH5q1QZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 15, 2026
अटक करण्यात आलेले अजमेर येथील अली अकबर, मेरठ येथील अनस आणि अंबाला येथील जंगवीर यांनी चौकशीत सांगितले की, पहिला स्फोट राजस्थानमधील हनुमानगड येथे घडवण्याची योजना होती; मात्र आर्डीएक्स मिळण्यास विलंब झाल्याने स्फोट करण्याचे नियोजन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर नवीन लक्ष्य निश्चित करण्यासाठी हरियाणा, पंजाब आणि देहली येथील अनेक भागांची आठवडाभर पहाणी करून त्याचे व्हिडिओ पाकमध्ये पाठवण्यात आले.
संपादकीय भूमिकास्फोट घडवण्याचा प्रयत्न करणार्यांना कारागृहात पोसत रहाण्याऐवजी त्यांना भर चौकात फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! |
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !