|

मुंबई – त्र्यंबकेश्वर-नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्वाचे आयोजन वर्ष २०२७ मध्ये करण्यात येत असून कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येणार आहेत. येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे, पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब समवेत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून हे कुंभपर्व जगाला आकर्षण वाटणारे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कुंभपर्वासाठी २२ सहस्र १८१ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित ‘कुंभमेळा शिखर समिती’च्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कुंभपर्वाच्या कामांमध्ये कुणी वाईट हेतूने किंवा मुद्दामहून विलंब होण्याच्या हेतूने अडथळा आणत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील, अशी चेतावणीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले,
१. कुंभपर्वाच्या कामांसाठी लागणार्या भूमीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला शेतकर्यांना देण्यात यावा.
२. स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून या कामांमध्ये करण्यात येणारी शौचालये दर्जेदार असावीत.
३. नाशिकला येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथेही जातील. त्यामुळे शिर्डी ते नाशिक रस्त्याचे काम करण्यात यावे.
४. भाविकांना संपर्कामध्ये कुठलीही अडचण होऊ नये; म्हणून भ्रमणभाष संपर्काची व्यवस्था भक्कम असावी. त्यासाठी आतापासूनच सिद्धता करण्यात यावी.
५. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि नाशिक येथील गोदावरी नदीतील पाणी कुंभपर्वात शुद्ध रहाण्यासाठी यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !