Mob Attacks Nuh Police : नूंह (हरियाणा) येथे चोरटा राहुल खान याला अटक करून नेणार्‍या पोलिसांवर मुसलमानांच्या जमावाकडून आक्रमण

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण घायाळ

आरोपी राहुल खान याला अटक

नूंह (हरियाणा) – नूंह जिल्ह्यातील वाजीदपूर गावात १० मार्च या दिवशी मेघालय पोलिसांनी ए.टी.एम्. (ऑटोमेटेड टेलर मशीन – स्वयंचलित रोकड वितरण यंत्र) लुटीच्या प्रकरणात आरोपी राहुल खान याला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलीस त्याला मेघालयला घेऊन जाण्यास निघाले. पोलिसांचे वाहन सिकरावा गावाजवळ पोचताच तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या मुसलमानांच्या जमावाने वाहनाला वेढा घातला. मुसलमानांनी वाहन थांबवण्याचा आणि नंतर ते उलथवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या गोळीबारात तारीफ नावाचा एक युवक घायाळ झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

या घटनेनंतर पिनंगवा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या प्रकरणात १२ व्यक्तींसह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आता व्हिडिओ आणि इतर पुरावे यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

संपादकीय भूमिका

देशात अनेक मुसलमानबहुल भागात मुसलमान आरोपीला पोलीस पकडायला गेल्यावर मुसलमानांकडून अनेक वेळा पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडतात. याविषयी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी पक्ष कधीच तोंड उघडत नाहीत !