पेठ (आंबेगाव) येथे हिंदु संमेलनाचे आयोजन

पुणे, ११ मार्च (वार्ता.) – धर्मशिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन स्वसंरक्षणासाठी सज्ज रहायला हवे, महिलांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण टाळून आपल्या महान हिंदु संस्कृतीचे आचरण करत साधना केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद कार्यरत असून संकट आपल्या दाराशी आहे. त्यामुळे आपण सिद्ध असले पाहिजे, असे शौर्ययुक्त विचार हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी मांडले. पेठ (आंबेगाव) येथे ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय आणि इस्कॉन या संघटना सहभागी झाल्या होत्या. प्रारंभी ग्रामप्रदक्षिणा करून ‘इस्कॉन’च्या वतीने नामसंकीर्तन करण्यात आले. नंतर गोमातेचे पूजन करून अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अमित महाराज कातळे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा उपसंपर्क प्रमुख श्री. अनिल चोधें (निवृत्त सैन्यदल) यांनी धर्मांतरित लोकांना स्वधर्मात परत आणण्याची आवश्यकता का आहे ? याचे विवेचन केले. त्यांनी त्यांचे सैन्य सेवेतील श्रीलंकेतील अनुभव कथन केले.
ह.भ.प. कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील न ऐकलेले प्रसंग वर्णन केले. त्यांनी आजचे तरुण, स्त्रिया आणि ज्येष्ठ यांना छत्रपती शिवरायांचा आदर्श घेण्यास सांगितले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !