जाणूया श्री अग्निदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

आज असलेल्या वैश्विक ‘अग्निहोत्र दिनाच्या’ निमित्ताने …

सनातनच्या ‘अग्निहोत्र’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. तेजतत्त्वाची ३ प्रमुख रूपे 

‘तेजतत्त्वाची ‘आकाशात सूर्य, वातावरणात वीज आणि पृथ्वीवर अग्नि’, अशी ३ प्रमुख रूपे आहेत. त्यांतील सूर्यदेव आणि अग्निदेव अशी २ प्रमुख उपास्य रूपे आहेत. अग्नीला देवतांचे मुख मानले आहे. ‘समष्टी स्तरावर ‘सूर्य’ आणि व्यष्टी स्तरावर ‘अग्निदेव’ या तेजतत्त्वाच्या प्रधान देवता आहेत.’

२. अग्निदेवाच्या २ पत्नी आणि अग्निदेवाचे कार्य 

‘स्वाहा’ आणि ‘स्वधा’ या अग्निदेवाच्या २ पत्नी आहेत. ‘स्वाहा’ ही अग्नीत अर्पण केलेला हविर्भाग, म्हणजे आहुती देवतांपर्यंत, तर ‘स्वधा’ ही अग्नीत अर्पण केलेला हविर्भाग, म्हणजे आहुती पितरांपर्यंत पोचवते. त्यामुळे अग्निदेव हा मनुष्य आणि देवता, तसेच मनुष्य अन् पितर यांच्यातील दुवा आहे.

३. विराट पुरुषाच्या दैवी देहात एकूण १० प्रकारच्या अग्नींचा वास असणे

३ अ. पचनासाठीचे अग्नी : ‘वैश्वानर (जठराग्नि), पाचकाग्नि, धात्वाग्नि, नेत्राग्नि, दिव्याग्नि किंवा रुद्राग्नि’, हे ५ प्रकारचे अग्नी विराट पुरुषाच्या देहात पचनाचे कार्य करतात.

३ आ. पंचाग्नी : ‘अंतरिक्ष, पर्जन्य, पृथ्वी, पुरुष आणि योषा’, हे पाच प्रकारचे अग्नी विराट पुरुषाच्या देहात वास करतात.

४. श्री अग्निदेवाची विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

४ अ. त्रैलोक्यातील प्रधान देवता : इंद्राला आकाशाची, वरुणाला वातावरणाची आणि अग्नीला पृथ्वीची देवता मानतात.

४ आ. वैदिक देवता : वैदिक कर्मकांडात इंद्र, अग्नि, वायु इत्यादी देवतांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

४ इ. ५ आदिदैवतांपैकी एक : अग्नि, सूर्य, चंद्र, वरुण (जल) आणि पवन (वायु) ही हिंदूंची ५ आदिदैवते आहेत.

४ ई. दिशास्वामी : ‘अग्निदेव’ हा आग्नेय दिशेचा स्वामी आहे.

४ उ. ब्रह्मांडातील ‘अग्निलोकाचे’ स्थान : ब्रह्मांडातील उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक यांच्यामध्ये सूर्यलोकाच्या उजवीकडे अग्निलोक आहे.

४ ऊ. शिवाच्या तिसर्‍या नेत्राचे प्रतीक : शिवाचा तिसरा नेत्र हा अग्नीच्या ‘वैश्वानर’ या रूपाचे प्रतीक आहे.

४ ए. देहातील ‘सुषुम्ना’ या कुंडलिनीनाडीशी संबंधित : देहातील सुषुम्नानाडी ही अग्नितत्त्वाशी संबंधित असल्यामुळे तिला ‘वैश्वानरनाडी’, असेही संबोधले आहे.


संकटकाळात नागरिकांच्या रक्षणाचा मूलमंत्र ठरणारा सनातनचा ग्रंथ !
अग्निहोत्र


संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले


अग्निहोत्र हे देव आणि निसर्ग यांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा मार्ग कसा आहे ?


अग्निहोत्रामुळे अणूयुद्धाद्वारे होणार्‍या प्रदूषणापासून रक्षण कसे होते ?


अग्निहोत्रामुळे होणारे सूक्ष्मातील परिणाम


अग्निहोत्राची होम, हवन, यज्ञ आदींशी तुलना


अग्निहोत्रातील प्रत्येक घटकामुळे होणारे वैद्यकीय, मानसिक  आणि आध्यात्मिक लाभ कोणते ?


साधनेच्या दृष्टीकोनातून अग्निहोत्राचे महत्त्व काय ? 


‘ॲमेझॉन किंडल’ आणि ‘गूगल प्ले बुक्स’वर ‘इ-बुक’चा त्वरित लाभ घ्या !


सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

 

४ ऐ. ‘नंदिनी’ या कामधेनूशी संबंधित असणे : समुद्रमंथनातून आलेल्या कामधेनूच्या ५ कामधेनू कन्यांपैकी जमदग्नीऋषींकडे असणार्‍या ‘नंदिनी’ या कामधेनूचा संबंध अग्नीतीर्थाशी आहे.

४ ओ. मनुष्याच्या तळहातावरील पाच महातीर्थे : ‘अग्नितीर्थ, ऋषितीर्थ, देवतीर्थ, पितृतीर्थ आणि आत्मतीर्थ’, ही मनुष्याच्या तळहातावरील पंचतीर्थे किंवा करतीर्थे आहेत.

४ औ. पाताळातील नद्या : सप्तपाताळांमध्ये ‘अग्निहोत्रा’ आणि यमलोकात ‘वैतरणा’ या नद्या वहातात.

४ अं. अष्टलोकपालांपैकी एक असणे : ‘सूर्य, चंद्र, अग्नि, वायु, पर्जन्य, इंद्र, यम आणि कुबेर’, हे अष्ट लोकपाल आहेत.

४ क. अष्टदिक्पालांपैकी एक असणे : ‘इंद्र, यम, वरुण, कुबेर, अग्नि, निऋति, वायु आणि ईशान’ हे अष्टदिक्पाल आहेत.

४ ख. ‘अग्निदुर्गा’ ही नवदुर्गांपैकी एक दुर्गा असणे : ‘वनदुर्गा, अग्निदुर्गा, शांतादुर्गा, विजयादुर्गा, जयदुर्गा, रिपुमारीदुर्गा, रुद्रांशदुर्गा, विंध्ववासिनीदुर्गा आणि नीलकंठीदुर्गा’, या नवदुर्गा आहेत.

४ ग. सर्व यज्ञांची प्रमुख देवता असणे : कोणताही यज्ञ अग्निदेवाविना पूर्ण होत नाही. त्यामुळे सर्व यज्ञांची प्रमुख देवता ‘अग्नि’ आहे.

५. प्रमुख धार्मिक विधींमध्ये कार्यरत असणार्‍या अग्नीच्या विविध रूपांची नावे !

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

६. अग्निहोत्र 

सुश्री (कु.) मधुरा भोसले

अग्निहोत्रात सूर्याेदयाला सूर्य आणि प्रजापति अन् सूर्यास्ताला अग्नि आणि प्रजापति यांना उद्देशून आहुती दिली जाते. अग्निहोत्रात हविष्य अर्पण करत असतांना पुढील मंत्रांचा उच्चार करावा.

६ अ. अग्निहोत्र करत असतांना सूर्याेदयाच्या वेळी म्हणायचा मंत्र –

‘सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ।’

६ आ. अग्निहोत्र करत असतांना सूर्यास्ताच्या वेळी म्हणायचा मंत्र –

‘अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ।’

टीप – ‘अग्निहोत्र केल्यामुळे होणारे लाभ आणि अन्य सूत्रे सनातनचा ग्रंथ ‘अग्निहोत्र’ या ग्रंथामध्ये सविस्तर दिलेली आहेत.’

कृतज्ञता : अग्निदेवामुळे जीवन चालू आहे. त्यामुळे अग्निदेवाच्या चरणी कोटीशः नमन करून हे कृतज्ञतापुष्प अर्पण करते.

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २५.२.२०२६, वेळ :  दुपारी १.१० ते २.३० आणि कालावधी : १ घंटा)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.