|

भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. इरफान अन्सारी नावाच्या एका मुसलमान तरुणाने ‘जयराम शर्मा’ अशी ओळख सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. कर्नाटकातील रहिवासी असलेला इरफान अन्सारी पीडित तरुणीला बलपूर्वक कर्नाटकात पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतांना शहीदनगर पोलिसांनी त्याला अटक केली.
A disturbing case of deception has come to light in Bhubaneswar.
A man identified as Irfan Ansari posed as ‘Jayram Sharma’ to trap a Hindu girl in a relationship.
The conspiracy was exposed after a fake Aadhar card was discovered.#Bhubaneswar #CrimeNews #Odisha pic.twitter.com/lr9lEwwKEF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2026
याविषयीच्या सविस्तर वृत्तानुसार, इरफान आणि पीडित हिंदु तरुणी यांची भेट कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये काम करतांना झाली. आरोपीने स्वतःची ‘जयराम शर्मा’ अशी ओळख सांगून तिच्याशी मैत्री केली. सामाजिक माध्यमावरून या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. जवळजवळ एक वर्ष आरोपीने त्याची खोटी ओळख वापरून महिलेला फसवले. पुढे पीडित तरुणी ओडिशाला परतली आणि पुरीमध्ये काम करू लागली. इरफान तिला वारंवार भेटायला येत असे. एक दिवस पीडित तरुणीला आरोपीची दोन वेगवेगळे आधारकार्ड सापडले. एका आधारकार्डवर ‘जयराम शर्मा’ असे नाव होते, तर दुसर्या कार्डवर ‘इरफान अन्सारी’ असे नाव होते. सत्य उघड होताच पीडित तरुणीने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. आपले गुपित उघडकीस आल्याचे पाहून आरोपी संतापला आणि त्याने तरुणीला खोलीस डांबून ठेवले आणि तिचा अमानुष छळ केला. आरोपी इरफानने तरुणीला धमकी देऊन बलपूर्वक कर्नाटकला घेऊन जाण्याचा कट रचत होता. याविषयी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहीदनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि तरुणीची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपीकडून शस्त्रे आणि अनेक बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीचा मोठ्या टोळीशी संबंध असल्याच्या शक्यतेचे पोलीस अन्वेषण करत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनी एका महिलेची शारीरिक छळापासून सुटका केल्याविषयी पोलिसांचे कौतुक होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !