
पुणे – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन आणि पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या सर्व (२०३) उद्यानांत ‘ऑक्सिजन सेंटर’ (वैद्यकीय प्राणवायू पुरवण्याचे ठिकाण) उभारण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील तक्रारी, कचरा व्यवस्थापन आणि भटक्या श्वानांच्या समस्या यांवर उपाययोजना करण्यात येणार असून वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्यात येईल, असे महापौर रती लांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यशासनाच्या सहकार्याने महापालिका १० महत्त्वाचे प्रकल्प राबवणार आहे. अण्णासाहेब मगर मैदान खासगी भागीदारीतून विकसित करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित करण्यात येईल. या मैदानात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करता येईल. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाकांक्षी ‘अजित सृष्टी’ प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती महापौर लांडगे यांनी दिली.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !