कॅनडातील शीख आणि हिंदू यांना संताप : यापुढे ३ मार्च ‘अँटी खालिस्तान डे’ म्हणून साजरा करणार !

नॅन्सी ग्रेवाल यांच्या हत्येचे प्रकरण

नॅन्सी ग्रेवाल

जालंधर (पंजाब) – खलिस्तानवाद्यांच्या विरोधात जागृती करणार्‍या गायिका आणि यू ट्यूबर (‘यू ट्यूब’वरून स्वतःचे व्हिडिओ प्रसारित करणार्‍या) नॅन्सी ग्रेवाल यांची ३ मार्चला हत्या करण्यात आली. यास विरोध करण्यासाठी कॅनेडियन डेमोक्रॅट्स, स्थानिक हिंदु आणि शीख संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले की, नॅन्सी एक चांगली व्यक्ती होती. आता यापुढे ३ मार्च हा ‘अँटी खलिस्तान डे’ (खलिस्तानविरोधी दिवस) म्हणून साजरा केला जाईल.

विंडसर वेस्टचे खासदार हर्ब गिल यांनी म्हटले की, परिसरातील अनेक लोकांप्रमाणे मलाही नॅन्सी ग्रेवाल यांच्या मृत्यूचे दुःख आहे. सामाजिक माध्यमांवरील त्यांच्या विचारांवरून हे स्पष्ट होते की, जगभरातील अनेक लोक त्यांच्या विचारांचे अनुसरण करत होते. नॅन्सी यांच्या आई ८ मार्चला कॅनडात पोचणार असून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतील.

संपादकीय भूमिका

असे दिवस साजरे करून खलिस्तानवादाला विरोध करण्यापेक्षा पुढील ३ मार्चपर्यंत (३ मार्च २०२७ पर्यंत) कॅनडाच्या भूमीतून खलिस्तावाद पूर्ण नष्ट करण्याचा निर्धार केला, तरच खलिस्तानवाद्यांना अद्दल घडेल, हे लक्षात घ्या !