Delhi Hindu Murder : होळीच्या दिवशी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात हिंदु तरुण ठार

  • देहलीतील उत्तमनगर येथील घटना

  • रंगाचा फुगा फुटून मुसलमान महिलेच्या अंगावर शिंतोडे पडल्याचे क्षुल्लक निमित्त

  • संतप्त हिंदूंकडून निषेध आणि मुसलमानाच्या घराची तोडफोड

देहली –  येथील उत्तमनगरमध्ये रंगाचा फुगा फुटून मुसलमान महिलेच्या अंगावर शिंतोडे पडल्याचे क्षुल्लक निमित्त साधून मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. यावेळी मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले. उत्तमनगरमधील जे.जे. कॉलनीच्या ‘ए ब्लॉक’मध्ये ही घटना घडली. या प्रकाराच्या विरोधात हिंदू संतप्त झाले असून त्यांनी आंदोलन केले आणि आरोपीच्या वाहनाला आग लावली.

१. होळीच्या दिवशी हिंदु कुटुंबातील ७ वर्षांच्या मुलीच्या हातातून रंगाने भरलेला फुगा निसटून खाली पडला. यावेळी रंगाचे शिंतोडे शेजारी उभ्या असलेल्या मुसलमान महिलेवर पडले. यावरून मुसलमान महिलेने वाद घातला. मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांनी त्याविषयी मुसलमान महिलेची क्षमाही मागितली. ‘मुलीने जाणूनबुजून फुगा फेकला नव्हता, तो चुकून हातातून पडला होता’, असे कुटुंबियांनी सांगितले.

२. त्यानंतर रात्री ११ वाजता या हिंदु कुटुंबातील तरुणाला १५ ते २० मुसलमानांनी काठ्यांनी मारहाण केली. मुसलमानांनी तरुणाच्या छातीवर दगड मारले, तसेच त्याच्या कुटुंबियांवर दगडफेक केली. यात मुसलमान महिलेच्या कुटुंबियांचा समावेश होता. या दगडफेकीत आजूबाजूच्या घरांच्या काचाही फुटल्या.

३. आक्रमणात गंभीररित्या घायाळ झालेल्या तरुणाला रुग्णालयात भरती केल्यावर आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. हिंदु तरुणाच्या मृत्यूनंतर परिसरात आक्रोश पसरला.

संतप्त हिंदूंकडून आरोपीची वाहने पेटवली

या घटनेवरून हिंदू संतप्त झाले. असून हिंदूंनी घटनेचा निषेध करत आंदोलन केले.  ६ मार्च या दिवशी संतप्त हिंदू आरोपीच्या घराबाहेर जमा झाले आणि त्यांनी घराची तोडफोड केली. आरोपीच्या घराबाहेर असलेले चारचाकी आणि दुचाकी वाहने यांना आग लावण्यात आली. बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रस्ते बंद केले आणि आरोपी मुसलमानांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अतिरिक्त अर्धसैनिक दल तैनात

घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोचले. त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर परिसरातील वातावरण तणावपूर्ण असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तेथे पोलीस आणि अर्धसैनिक दलाचे सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

  • क्षुल्लक कारणावरून हिंदूंच्या जिवावर उठलेले मुसलमान ! आता हिंदूंनी सणही साजरे करायचे नाहीत का ?
  • बहुसंख्य हिंदु असलेल्या भारतात हिंदूंना त्यांच्या सणांच्या वेळी मुसलमानांच्या आक्रमणाला सामोरे जावे लागत आहे, हे सरकार आणि हिंदू यांना लज्जास्पद !
  • हिंदूंकडून कधीही न झालेल्या आणि कथित ‘मॉब लिंचिंग’विषयी (जमावाने केलेल्या हत्येविषयी) सार्वजनिक मंचावरून बोलले जाते. आता उत्तमनगरमधील एका हिंदु तरुणाच्या झालेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी कुणी काही बोलेल का ?