तमिळनाडूतील मंदिरात विधीपूर्वक पुन्हा स्थापना होणार

लंडन (ब्रिटन) – येथील ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या ‘एशमोलियन संग्रहालया’ने तमिळनाडूतील १६ व्या शतकातील अत्यंत मौल्यवान कांस्य मूर्ती भारताला परत केली आहे. तमिळनाडूतील भगवान श्रीविष्णूचे भक्त असलेले १६ व्या शतकातील महान संत थिरुमंगई आळवार यांची ही मूर्ती आहे. लंडनच्या ‘इंडिया हाऊस’मध्ये झालेल्या एका समारंभात ही मूर्ती भारतीय अधिकार्यांकडे सुपुर्द करण्यात आली. ५०० वर्षे प्राचीन असलेली ही मूर्ती आता तमिळनाडूतील त्या मंदिरात पुन्हा स्थापित केली जाणार आहे, जिथून ती अनेक दशकांपूर्वी चोरीला गेली होती.
500-Year-Old Sacred Idol set to Return to India
Britain has returned a 500-year-old bronze idol of Vaishnavite saint-poet Tirumankai Alvar from the Vijayanagara era.
The statue, earlier kept at Oxford’s Ashmolean Museum, was confirmed to have been stolen from a Tamil Nadu… pic.twitter.com/j4OhCI80Kn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2026
असा झाला मूर्तीचा उलगडा !
१. ऑक्सफर्डमधील या संग्रहालयाने ही मूर्ती वर्ष १९६७ मध्ये खरेदी केली होती.
२. वर्ष २०१९ मध्ये एका संशोधकाने उघड केले की, ही मूर्ती तमिळनाडूच्या थाडिकोम्बु येथील ‘श्री सौंदरराजा पेरुमल मंदिरा’तील आहे.
३. या दाव्याचे अन्वेषण केले असता, त्यात तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि तमिळनाडू शासन यांनी यासंदर्भातील ठोस पुरावे सादर केले.
४. एशमोलियन संग्रहालयाचे संचालक डॉ. झा स्टर्गिस यांनी सांगितले की, ही मूर्ती त्यांनी चांगल्या हेतूने खरेदी केली होती; मात्र सत्य समोर आल्यानंतर ती परत करणेच योग्य होते. विशेष म्हणजे या संग्रहालयाच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही देशाला त्याची वस्तू परत करण्यात आली आहे.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध : रासायनिक लेपनामुळे मूर्तीची हानी !
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !