जनसहभाग, जनजागृती आणि पर्यावरण रक्षण अन् संवर्धन यांतून उभा राहिला हिंदु जनजागृती समितीचा आदर्श उपक्रम !

पुणे, ३ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती मागील २३ वर्षांपासून खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवत आहे. धरण परिसरात जलाशय रक्षणाची अखंड, अविरत आणि प्रेरणादायी मोहीम खडकवासला ग्रामस्थ, तसेच सामाजिक जाणीव असलेल्या पुणेकरांच्या सहभागातून प्रतिवर्षी होत असते. या मोहिमेचे यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. भाजपचे विद्यमान आमदार भीमराव (आण्णा) तापकीर यांनी नारळ वाढवून मोहिमेचे उद्घाटन केले.


धूलिवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी जलाशयाचे पावित्र्य अबाधित रहावे, या संकल्पातून हिंदु जनजागृती समितीचे साधक खडकवासला ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाचे रक्षण करतात.
🌊🚩 24 Years of Resolute Environmental Protection!
For 23 continuous years, @HinduJagrutiOrg has led the Khadakwasla Reservoir Protection Campaign with unwavering dedication. Now in its 24th year, this people-powered movement continues to inspire
Inaugurated this year by BJP… pic.twitter.com/8pm2DmloN0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2026
समितीची ही मोहीम प्रतिवर्षी १०० टक्के यशस्वी झाली आहे. मोहीम चालू झाल्यापासून एकाही व्यक्तीने जलाशयात प्रवेश केला नाही. निसर्गरक्षणाचा ध्यास, समाज प्रबोधनाची तळमळ, तसेच कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे ही मोहीम पर्यावरण संवर्धनाचा एक दीपस्तंभ ठरली आहे.

पुणे शहर आणि परिसरातून आलेले २०० हून अधिक धर्मप्रेमी प्रबोधनात्मक फलक हातात धरून खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून उभे होते. सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत ही मोहीम राबवली गेली. जिल्ह्यातील पारगाव, दौंड, सासवड, तळेगाव, भोर, मांजरी, तसेच पुणे शहरातून धर्मप्रेमी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी झाले होते.


हिंदू जनजागृति समितिचे प्रसिद्धीपत्रक !
उपस्थित मान्यवर
भाजपचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव (आण्णा) तापकीर, पुणे महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका सौ. धनश्री दत्तात्रय कोल्हे, भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. दत्तात्रय कोल्हे, भारतीय जनता युवा मोर्चा खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष सारंग नवले, नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस
Twenty four years of relentless commitment to protect Khadakwasla from water pollution & illegal activities!
Over 200 dedicated citizens from #Pune and surrounding areas, along with activists of Hindu Janajagruti Samiti, formed a resolute human chain around #Khadakwasla… pic.twitter.com/tHABrqZqao
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) March 3, 2026
विशेष सहकार्य !
‘श्री राधाकृष्ण प्युअर व्हेज’चे श्रीकांत शेट्टी, ‘अन्नपूर्णा मेस’चे कमलेश सिंह राजपुरोहित, श्रीमती निर्मला फडणीस, सर्वश्री. निखिल पायगुडे, उमेश गोरे, यशवंत बापू लायगुडे
वर्ष २००३ मध्ये अशी चालू झाली मोहीम !धर्मशिक्षणाच्या अभावी सण-उत्सव यांमागील मूळ उद्देश लोप पावत चालला आहे. धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंग लावून नागरिक खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येत होते. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा मुख्य जलस्रोत यामुळे प्रदूषित होत होता. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय जलसंपत्ती रक्षणाच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने खडकवासला जलाशय रक्षणाचा उपक्रम वर्ष २००३ मध्येच हाती घेतला. |
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !