अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धही चालूच

काबुल (अफगाणिस्तान) – एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणवर आक्रमण करत आहेत, तरी दुसरीकडे अफगाणिस्तान अन् पाकिस्तान यांच्यातील युद्धही चालूच आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर ड्रोनद्वारे आक्रमण केले. तालिबानने हा दावा केला आहे की, पाकिस्तानी सैन्य आणि वायूदलांचे तळ यांच्यावर आक्रमण करण्यात आले आहे. अफगाणी सैन्याने पाकच्या रावळपिंडी येथील नूर खान वायूदलाचे तळ, बलुचिस्तानच्या क्वेटा येथील पाक सैन्याचे १२ व्या डिविजनचे मुख्यालय आणि खैबर पख्तुनवा येथील ख्वाजाई कँप या सैन्य तळांवर आक्रमण केले. यात पाकिस्तानचे ३२ सैनिक मारले गेल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. विशेष म्हणजे नूर खान वायूदलाच्या तळावर भारतानेही ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले होते.
Afghanistan-Pakistan Tensions Escalate ⚠️
Amid the ongoing conflict between Afghanistan and Pakistan, reports claim that Afghanistan has carried out drone strikes targeting Pakistani military bases.
Sources indicate that 32 Pakistani soldiers have reportedly been killed.
The… pic.twitter.com/dbQFiUb6k9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2026
आमच्यावर आक्रमण केले, तर आम्ही चोख प्रत्युत्तर देणार ! – अफगाणिस्तान
अगाणिस्तानने पाकला चेतावणी देतांना म्हटले आहे की, पाकिस्तानने आमच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले, तर आम्ही चोखपणे त्याचे प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानने काबुलच्या जवळ असलेल्या बगराम वायूदल तळावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही आज केलेला ड्रोन आक्रमण त्याचेच उत्तर आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman