पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील युद्ध

वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध चालू झाल्यापासून आतापर्यंत दोन्ही देशांकडून एकमेकांच्या सैनिकांना ठार केल्याचे दावे केले जात आहेत. पाकिस्तानने काबुल, कंदाहार आणि पक्तिया या ठिकाणी केलेल्या हवाई आक्रमणात अफगाणिस्तानच्या २७० हून अधिक सैनिकांना मारल्याचा, तर अफगाणिस्तानने केलेल्या आक्रमणात पाकिस्तानच्या ७० सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याऐवजी तालिबानवरील आक्रमणासाठी पाकचे समर्थन केले आहे.
Pakistan–Afghanistan war intensifies: Pakistan claims 270+ Afghan soldiers killed in strikes on Kabul, Kandahar & Paktia; Afghanistan says 70 Pakistani soldiers died in retaliation.
Yet U.S. President Donald Trump backs Pakistan instead of urging a ceasefire – while repeatedly… pic.twitter.com/lB8dWgBTo5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2026
पाकचे पंतप्रधान आणि सैन्यदलप्रमुख यांच्याशी माझे चांगले संबंध ! – ट्रम्प
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धावर एका पाकिस्तानी पत्रकाराने ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, ‘मी यात मध्यस्थी करू शकतो; पण तुम्हाला ठाऊक आहेच की, पाकिस्तानशी माझे चांगले संबंध आहेत. तिथे एक उत्तम पंतप्रधान आहेत. त्यांचे सैन्यदलप्रमुखही चांगले आहेत. मी त्या दोघांचाही आदर करतो. पाकिस्तान चांगले काम करत आहे. तालिबानच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे’, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
(म्हणे) ‘पाकला तालिबानच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार !’ – अमेरिका
अमेरिकेचे सचिव ॲलिसन हूकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली आणि त्यांना अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आम्ही या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. तालिबानच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानच्या अधिकाराचे आम्ही समर्थन करतो.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान देशांमध्ये रहाणार्या अमेरिकी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या जाणार आहेत. या दोन देशांत रहाणार्या अमेरिकी नागरिकांना सावध रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman