
राजापूर (जिल्हा रत्नागिरी) – येथील पितांबरी उद्योगसमुहाच्या ‘पितांबरी इस्टेट तळवडे’ येथे श्री गणेश, श्री दत्तगुरु आणि श्री महालसा नारायणी मंदिराची विधीवत स्थापना करण्यात आली. पितांबरी आस्थापनाची ‘ॲग्रो टुरिझम’ ही संकल्पना राबवल्यानंतर विविध भागांतून पर्यटक येथे येत असतात. त्यांना येथे देवदर्शन मिळावे ही भावना होती. श्री महालसा नारायणी ही पितांबरीच्या डॉ. रविंद्र प्रभुदेसाई कुटुंबियांची कुलदेवता आहे, श्री दत्तगुरूंवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे आणि श्री गणेश ही आद्यदेवता आहे. या सर्वांचे एकत्र दर्शन मिळावे, यासाठी ‘पितांबरी ॲग्रो टुरिझम तळवडे’ येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली. २२ फेब्रुवारी या दिवशी मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम पार पडले.
या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि साधक यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तळवडेच्या सरपंच सौ. गायत्री साळवी, पितांबरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माधव पुजारी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुरेश गुडेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद भारद्वाज यांच्यासह पितांबरीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पितांबरीचे श्री. प्रदीप प्रभुदेसाई यांनी केले. डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांनी ‘हे मंदिर सर्वांना खुले असेल’, असे सांगितले.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !