थिरूवनंतपूरम् (केरलम्) – ‘द केरल स्टोरी २’ या चित्रपटाच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात ३ याचिका प्रविष्ट करून त्याचे प्रदर्शन स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकांवर २४ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने चित्रपटाला दिलेल्या प्रमाणपत्राविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) प्रश्न विचारले आहेत. ‘चित्रपटामुळे धार्मिक तणाव वाढू शकतो. केरळसारख्या धर्मनिरपेक्ष राज्याचे धार्मिक दृष्टीकोनातून चित्रण केले जात असल्यास मंडळाची भूमिका महत्त्वाची ठरते’, असे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने सुनावणीच्या वेळी म्हटले की,
१. केरळ अत्यंत धर्मनिरपेक्ष राज्य आहे, येथे पूर्ण सौहार्द आहे; परंतु एखादी घटना संपूर्ण राज्यात घडल्याप्रमाणे दाखवली जाते, तेव्हा त्याचा विचार केला आहे का ? त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि भावना भडकू शकतात. अशा वेळी परिनिरीक्षण मंडळाची भूमिका महत्त्वाची असते. चित्रपट खर्या घटनांवर आधारित असल्याचा दावा केला जात असल्याने चुकीचे चित्रण आणि धार्मिक तणाव निर्माण होण्याविषयी याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेल्या चिंता योग्य वाटतात.
२. चित्रपटाच्या नावात केरळचा उल्लेख असल्यामुळे राज्यातील लोकांच्या चिंता दुर्लक्षित करता येणार नाहीत. साधारणपणे न्यायालय कोणत्याही चित्रपटात हस्तक्षेप करत नाही; कारण ती कलाकृती असते; मात्र तुम्ही हा चित्रपट खर्या घटनांवर आधारित असल्याचे सांगता आणि त्याला ‘केरळ’ असे नाव देता, त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो.
३. सृजनशील स्वातंत्र्य असते; परंतु परिनिरीक्षण मंडळाने घालून दिलेल्या काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हाला याची जाणीव आहे का ?, हा प्रश्न आहे. केवळ कल्पना नसून तुम्ही हा चित्रपट खर्या घटनांवर प्रेरित असल्याचे म्हणता, याला महत्त्व आहे.
न्यायालयाच्या निर्णयापर्यंत टीझर (छोटे विज्ञापन) हटवण्यास निर्माते सहमत
चित्रपट निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता एस्. श्रीकुमार यांनी न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रदर्शित करण्यात आलेले टीझर हटवण्यास सहमती दर्शवली. तसेच न्यायमूर्ती कुरियन यांनी निर्णय देण्यापूर्वी चित्रपट पहावा यासाठी विशेष प्रदर्शन आयोजित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा