Suspended BJP MLA Yatnal : जे वन्दे मातरम् म्हणणार नाहीत, त्यांनी म. गांधी यांनी दिलेल्या पाकमध्ये चालते व्हावे !

  • कर्नाटकातील भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे विधान

  • काँग्रेसने दर्शवला विरोध

विजयपूर (कर्नाटक) – जे वन्दे मातरम् म्हणणार नाहीत किंवा मातृभूमीला वंदन करणार नाहीत, त्यांनी म. गांधी यांनी दिलेल्या पाकिस्तानात चालते व्हावे. या देशात रहायचे असेल, तर वन्दे मातरम् म्हणावेच लागेल. आमच्यासाठी आंबेडकर पुरेसे आहेत. आमच्यासाठी गांधी भारताचे राष्ट्रपिता नाहीत. ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत. आम्ही त्यांना आमचे राष्ट्रपिता मानत नाही. आम्ही नेहरूंनाही आमचे पहिले पंतप्रधान मानत नाही. आमचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस होते, असा घणाघात येथील भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला. ते एका सार्वजनिक सभेत बोलत होते. या वक्तव्यावरून काँग्रेसने विरोध करण्यास आरंभले आहे.

काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खर्गे यांनी या वक्तव्याला विरोध केला. ते म्हणाले की, हे विधान गांधी यांच्या योगदानाचा अपमान आहे. गांधींनी संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. (हे विधान म्हणजे स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या क्रांतीकारकांचा अवमान नव्हे नव्हे का ? – संपादक) पाकिस्तानचे विभाजन हे ब्रिटिशांच्या धोरणांचा परिणाम होता. (ब्रिटिशांच्या धोरणांचा नाही, तर म. गांधी यांचा अट्टहास आणि महंमद अली जिना यांच्या ‘मुस्लिम लीग’चे षड्यंत्र यांचा परिणाम होता, हे सत्य दडपू नका ! – संपादक) भाजप अशा आमदारांवर कारवाई का करत नाही ?, असा प्रश्नही त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही या वक्तव्याला विभाजनकारी राजकारण म्हणत नाकारले आहे. (बंगालमध्ये जे चालू आहे, त्यातून तर भारताचे प्रत्यक्ष पुनर्विभाजन करून ‘पूर्व बांगलादेश’ बनवण्याचे षड्यंत्र तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच रचले जात आहे, त्याचे काय ? – संपादक)

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी ‘आमदार यत्नाळ यांचे हे वैयक्तिक मत आहे. पक्षाचा त्या वक्तव्याशी संबंध नसून आम्ही गांधी आणि आंबेडकर दोघांचाही सन्मान करतो’, असे स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या अनेक पिढ्यांनी ‘वन्दे मातरम्’च्या नावावर मुसलमानांना चुचकारलेच आहे. यातून धर्मांध मुसलमानांना आयते कोलित मिळाल्याने त्यांनी ‘वन्दे मातरम्’चा आणि ओघाने देशाचा सातत्याने अवमानच केला. त्यामुळे केवळ त्यांनीच नव्हे, तर त्यांना प्रिय असणार्‍या काँग्रेसनेही पाकिस्तानात चालते व्हावे, असे कुणी म्हटल्यास चुकले कुठे !