
वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना झटका देत आयात शुल्क रहित करण्याचा निकाल दिल्यानंतर २४ फेब्रुवारीपासून ‘आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा (ईपा)’ अंतर्गत लादलेले शुल्क वसूल करणे थांबवण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या ‘कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ने दिली आहे.
‘कार्गो सिस्टम्स मेसेजिंग सर्व्हिस’द्वारे पाठवलेल्या नोटीसीमध्ये, ‘राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ईपाशी संबंधित पूर्वीच्या आदेशांशी संबंधित सर्व शुल्क निष्क्रीय केले जातील’, असे नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हे शुल्क बेकायदेशीर ठरवल्यानंतर तीन दिवसांनी हा निर्णय घोषित करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयामुळे आयातदारांकडून मोठ्या प्रमाणावर परतफेडीचे दावे येण्याची शक्यता आहे.
नवीन १५ टक्के आयात शुल्क घेतले जाणार
‘सीबीपी’ने स्पष्ट केले की, ही स्थगिती केवळ ‘ईपा’च्या अंतर्गत लादलेल्या शुल्कांपुरती मर्यादित आहे. सध्याच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर कायद्यांखाली लागू केलेल्या १५ टक्के आयात शुल्कावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. यात राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावर आधारित व्यापार विस्तार कायद्याच्या कलम २३२ अंतर्गत लादलेले शुल्क आणि अन्याय्य व्यापार पद्धतींवर कारवाई करणार्या व्यापार कायद्याच्या कलम ३०१ अंतर्गत लादलेले शुल्क यांचा समावेश आहे.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !