|

तेल अविव (इस्रायल) – जर इस्रायलने मध्य-पूर्वेतील बहुतांश भाग कह्यात घेतला, तरी आम्हाला त्याची काहीही अडचण नाही, असे विधान इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माइक हकाबी यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. १४ अरब आणि इस्लामी देशांनी संयुक्त निवेदन प्रसारित करून या विधानाचा निषेध केला आहे.
एका दूरचित्रवाणी मुलाखतीत पत्रकार कार्लसन यांनी बायबलमधील एका माहितीचा उल्लेख केला, ज्यात अब्राहामच्या वंशजांना (ज्यूंना) भूमी देण्याचे वचन असल्याचे सांगितले जाते. त्यात युफ्रेटीस नदीपासून नाईल नदीपर्यंतच्या प्रदेशाचा संदर्भ आहे. आजच्या परिस्थितीत या क्षेत्रात लेबनॉन, सीरिया, जॉर्डन आणि सौदी अरेबियाचा काही भाग यांचा समावेश होतो. यावर अमेरिकी राजदूत हकाबी यांनी म्हटले, ‘जर त्यांनी सर्व काही घेतले तरी ते ‘योग्य’ ठरेल.’ त्यांनी पुढे स्पष्ट केले की, इस्रायल या भागांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तेही असा नियंत्रण करण्याचे आवाहन करत नाहीत.
कोण आहेत निषेध करणारे देश ?
या विधानानंतर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, कतार, इंडोनेशिया, तुर्कीये, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, बहरीन, लेबनॉन, सीरिया आणि पॅलेस्टाईन यांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी संयुक्त निवेदन प्रसारित करून याचा निषेध केला आणि हे विधान धोकादायक अन् चिथावणीखोर असल्याचे म्हटले.
गल्फ सहकार्य परिषद, अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटना यांच्या सचिवालयांनीही आक्षेप नोंदवला आणि अशा प्रकारच्या टिपण्या प्रदेशातील सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य यांसाठी धोकादायक असल्याचे नमूद केले.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री