आतंकवादविरोधी पथकाच्या धाडीत बंदी घातलेल्या ‘सीमी’शी संबंधित लोक असल्याचे उघड !

यवतमाळ – आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेला फुटबॉल हा खेळ महाराष्ट्रात मात्र आतंकवादाचे केंद्र बनला आहे. जिल्ह्यातील पुसद येथील फुटबॉल क्लब हे तरुणांचा बुद्धीभेद करण्याचे केंद्र बनवण्यात येत असल्याचे आंतकवादविरोधी पथकाच्या कारवायांमध्ये पुढे आले आहे.
आतंकवादविरोधी पथकाने महाराष्ट्रात नुकत्याच यवतमाळ आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत २१ ठिकाणी धाडी घातल्या. त्या वेळी जिहादी विचारांचे साहित्य, तलवारी आणि शस्त्रे मिळाली, तसेच फुटबॉल खेळण्याच्या नावाखाली तरुणांमध्ये जिहादी विचार पेरले जात असल्याचे लक्षात आले.
येथील फुटबॉल क्लबने खेळाडूंना राज्याबाहेर पाठवले होते. पोलिसांनी या क्लबवर धाड घातली, तेव्हा अशा प्रकारे जिहादी बनवण्याची केंद्रे अनेक ठिकाणी चालत असल्याचे लक्षात आले. राज्याबाहेरही याचे मोठे जाळे असल्याचे आतंकवादविरोधी पथकाच्या लक्षात आले. पूर्वी बंदी घातलेल्या ‘सीमी’ संघटनेशी जोडलेले या जिहादी गटाचा भाग आहेत, त्यामुळे कागदोपत्री बंदी घातलेली संघटना प्रत्यक्षात जिहादी कार्य करत असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे !
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू