भारतातील प्रतिवर्षी दानशूर व्यक्ती करतात ५४ सहस्र कोटी रुपयांचे दान

नवी देहली – ‘हाऊ इंडिया गिव्हज २०२५’च्या अहवालानुसार भारतात वैयक्तिक दानाचा ४५.९ टक्के भाग धार्मिक संस्थांना दिला जातो. ४१.८ टक्के दान थेट अत्यंत गरीब, गरजू आणि भिकारी यांना मिळते. धार्मिक नसणार्या संस्थांपर्यंत केवळ १४.९ टक्के दान पोचते. देशातील दानाचा सर्वांत मोठा आधार सामान्य घरे आहेत. ६८ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या रूपात साहाय्य करत असतात. एकूण घरगुती दानाचा अंदाज प्रतिवर्षी ५४ सहस्र कोटी रुपये आहे. हा अभ्यास २० राज्यांमधील सर्वेक्षणावर आधारित आहे. भारतीय हे जगातील सर्वांत उदार लोकांपैकी एक असल्याचे यात म्हटले आहे.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !