
नवी देहली – मोगल शासक बाबर किंवा बाबरी मशीद यांच्या नावाने कोणतीही मशीद अथवा धार्मिक रचना उभारण्यास किंवा नामकरण करण्यास बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपिठाने याचिकेवर विचार करण्याची इच्छा दर्शवली नाही. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वतीने उपस्थित अधिवक्त्यांनी याचिका मागे घेतली. तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायू कबीर यांनी बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीची प्रतिकृती उभारण्याची घोषणा केल्याचा उल्लेखही याचिकेत करण्यात आला होता.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !