
उज्जैन (मध्यप्रदेश) – हिंदूंसारखी वेशभूषा करून, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिळा आणि भगवे वस्त्र परिधान करून फिरणार्या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. विशेष म्हणजे तो प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिरासह मंगलनाथ मंदिर परिसरातही फिरत होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चौकशी केली, तर काहींनी त्याला चोपले.
Bajrang Dal members beat a Muslim man wearing saffron clothes near the Shri Mahakaleshwar Temple in Ujjain (Madhya Pradesh).
Attempts to disguise identity in sensitive religious spaces can trigger security concerns and public suspicion.
Strict and uniform security protocols -… pic.twitter.com/YBSlqVHtBr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2026
१. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक ऋषभ कुशवाह यांनी सांगितले की, एका तरुणाने हॉटेलमध्ये रहाण्यासाठी खोली घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली होती; मात्र तो स्वतःच्या ओळखपत्राऐवजी मुलीच्या ओळखपत्रावर खोली आरक्षित करत होता. माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते नानाखेडा येथे पोचली. तेथे संबंधित तरुण आढळला. त्याची वेशभूषा पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. कारण तो मुसलमान होता; पण ओळख लपवण्यासाठी भगवे वस्त्र परिधान केले होते. गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर टिळा लावला होता.
२. तरुणाला नाव विचारले असता त्याने हिंदु नाव सांगितले; मात्र त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवर त्याचे नाव जाफर असल्याचे स्पष्ट झाले. सांगितले जाते की, जाफर एका मुलीला देहलीहून उज्जैन येथे घेऊन आला होता. हॉटेलमध्ये खोली घेण्यासाठी त्याने स्वतःच्या ओळखपत्राऐवजी मुलीच्या कागदपत्रांचा वापर केला होता.
३. कार्यकर्त्यांनी कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो मुलीसह महाशिवरात्री निमित्त मंगलनाथ आणि महाकाल मंदिर परिसरात दिवसभर फिरत होता आणि सायंकाळी हॉटेलमध्ये गेला होता.
४. काही कार्यकर्त्यांनी जाफरला चोपले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या कह्यात दिले.
संपादकीय भूमिकाउद्या अशा धर्मांधांनी घातपात केला, तर आश्चर्य वाटू नये ! यासाठी मंदिराच्या ठिकाणी प्रवेशापूर्वी प्रत्येकाचे आधारकार्ड, मतदानकार्ड आदी ओळखपत्रे तपासली पाहिजेत ! |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी