नवी देहली – विवाहाच्या वेळी केवळ सप्तपदीचा विधी झाला नाही; म्हणून तो विवाह अवैध ठरत नाही, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘जोडप्याने काही विधी पार पाडल्यानंतर एकत्र रहाण्यास प्रारंभ केला आणि त्यांच्या विवाहातून एक अपत्य जन्माला आले असेल, तर तो विवाह अवैध ठरवता येणार नाही’, असे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण ?
याचिकाकर्त्याचे १९ जून २०१६ मध्ये एकमेकांना हार घालून लग्न झाले; परंतु या वेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात सप्तपदी विधी झाला नाही. त्यानंतर हे जोडपे एकत्र राहू लागले. त्यांच्या सहजीवनातून त्यांना एक मुलगीही झाली; परंतु याचिकार्त्याने असा युक्तीवाद केला की, ऑक्टोबर २०१६ पासून तो पत्नीसमेवत रहात नव्हता. त्या दोघांमध्ये सप्तपदीचा विधी झाला नसल्याने त्याने पत्नीसमेवत रहाण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याच्या पत्नीने दावा केला की, ऑक्टोबर २०१७ मध्ये तिला सासरच्या घरातून हाकलून लावण्यात आले. तसेच लग्नसोहळ्यात सप्तपदी कार्यक्रम झाला असल्याचा दावाही पत्नीने केला; परंतु या सोहळ्याची छायाचित्रे न्यायालयासमोर ठेवण्यास ती अपयशी ठरली.
काय आहे हिंदु विवाह कायदा ?
उच्च न्यायालयाने हिंदु विवाह कायदा १९५५ च्या कलम ७ अंतर्गत वैधानिक योजनेचे विश्लेषण केले. कलम ७ मधील उपकलम १ नुसार कोणत्याही विशिष्ट समारंभाचे बंधन न घालता कोणत्याही पक्षाच्या रीतिरिवाजानुसार आणि समारंभानुसार विवाह करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसेच उप कलम २ नुसार वैध विवाह स्थापित करण्यासाठी प्रत्येकवेळी सप्तपदी करणे अपरिहार्य नाही. म्हणजेच सप्तपदी हा पारंपरिक संस्कारांचा एक भाग आहे; पण हा विधी बंधनकारक नाही, असे नमूद केले.

न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा