गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – हिंदूंची लोकसंख्या वाढ आणि सामाजिक संतुलनाचा कार्यक्रम पुढे नेण्याच्या उद्देशाने हिंदु रक्षा दलाने त्याच्या घोषणेच्या कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. पिंकी चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एका दांपत्याने चौथे अपत्य जन्माला घातल्यानंतर एका हिंदु दांपत्याला २१ सहस्र रुपयांची प्रोत्साहन रक्कम प्रदान केली.
Ghaziabad (Uttar Pradesh): ₹21,000 given by Hindu Raksha Dal to a Hindu couple on the birth of their 4th child.
Will numbers alone secure the future? History teaches otherwise.
The Pandavas were just five against a hundred Kauravas in the Mahabharata; yet they triumphed… pic.twitter.com/6B6ujFgu0c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2026
‘हिंदु समाजातील लोकसंख्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी हिंदु रक्षा दल आर्थिक साहाय्य देईल’, अशी घोषणा श्री. पिंकी चौधरी यांनी केली होती. देहलीतील गगन विहार परिसरातील मनोज आणि पुष्पा या दांपत्याला ६ फेब्रुवारी या दिवशी मुलगी झाली. ही माहिती मिळताच श्री. पिंकी चौधरी यांनी दांपत्याची भेट घेऊन त्यांना प्रोत्साहन म्हणून २१ सहस्र रुपयांची रक्कम दिली.
पाचव्या अपत्यावर ३१ सहस्र रुपयांचे साहाय्य देणार
संघटनेची भूमिका स्पष्ट करतांना श्री. पिंकी चौधरी यांनी ‘हा उपक्रम एका कुटुंबापुरता मर्यादित नाही. कोणतेही हिंदु कुटुंब पाचव्या अपत्यास जन्म देईल, तर संघटनेकडून त्याला ३१ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाईल. हिंदु कुटुंबांनी हिंदूंची लोकसंख्या टिकवण्यासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक आहे. सनातन कुटुंबे वाढली, तरच देश सुरक्षित राहील, असे त्यांनी नमूद केले.
संपादकीय भूमिका
|

२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin