सार्वजनिक सभेत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केल्याचे प्रकरण
(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ६५ वर्षीय द्रमुक नेते जे. शिवाजी कृष्णमूर्ती यांना २ वर्षांची कारावासाची शिक्षा आणि २० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. सार्वजनिक सभेत आक्षेपार्ह आणि अशोभनीय वक्तव्य केल्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली.
ही घटना १६ जून २०२३ या दिवशी एरुक्कनचेरी येथील कृष्णमूर्ती सभागृहात आयोजित सार्वजनिक बैठकीत घडली होती. त्या वेळी शिवाजी यांनी त्यांच्या भाषणात राज्यपाल, अभिनेत्री आणि नंतर नेत्या बनलेल्या खुशबू सुंदर, विरोधी पक्षनेते एडप्पादी के. पलानीस्वामी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई आणि माजी मंत्री डी. जयकुमार यांचा उल्लेख करत अपमानास्पद आणि अश्लील भाषा वापरली होती. या भाषणानंतर वाद निर्माण झाला आणि पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी शिवाजी यांना अटक करून आरोपपत्र प्रविष्ट केले होते.
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !