‘टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढतांना ‘शहीद’ झाले, सावरकरांसारखी प्रेमपत्रे लिहिली नाहीत !’ – असदुद्दीन ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांचे संतापजनक विधान !

असदुद्दीन ओवैसी (मध्यभागी)

भाग्यनगर (तेलंगाणा)  – टिपू सुलतान वर्ष १७९९ मध्ये ‘शहीद’ (हुतात्मा) झाले. इंग्रजांविरुद्ध लढतांना त्यांनी बलीदान दिले. टिपूंनी कारागृहात बसून तुमच्या वीर सावरकरांसारखी इंग्रजांना ६-६ प्रेमपत्रे लिहून ‘तुम्ही जे सांगाल, ते करीन’, असे सांगून क्षमा मागितली नाही. टिपू सुलतान तलवार हातात घेऊन देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी लढले आणि शहीद झाले, असे विधान ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी येथे एका कार्यक्रमात केले. मालेगाव येथील नगरपालिकेत एका कक्षात टिपूचे चित्र लावल्याच्या प्रकरणावरून त्यांनी हे विधान केले.

खासदार ओवैसी पुढे म्हणाले की,

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या पुस्तकात, ‘आज भारताकडे असलेले क्षेपणास्त्र आणि रॉकेट तंत्रज्ञान ही टिपूंच्या स्वप्नांची पूर्तता आहे’, असे लिहिले आहे. हे खोटे आहे का ? तसेच म. गांधी यांनी त्यांच्या ‘यंग एज’ या नियतकालिकात ‘टिपू सुलतान हे हिंदु-मुसलमान ऐक्याचे प्रतीक आहेत’, असे लिहिले होते. (म. गांधी यांच्या अशाच मानसिकतमुळे भारताची पुढे फाळणी झाली, हे ओवैसी का सांगत नाहीत ? टिपूने एकाच दिवसात १ लाख हिंदूंचे धर्मांतर केले होते, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत ? – संपादक)

तसेच वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवर टीका करत न्यायमूर्ती कपूर आयोगाने म. गांधी हत्या प्रकरणात सावरकर यांना कटातील सहभागी म्हटले होते, असे त्यांनी नमूद केले. (न्यायालयाने या खटल्यात सावरकर यांना निर्दाेष मुक्त केले होते, हाच इतिहास आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • टिपू सुलतान स्वतःचे राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांशी लढतांना ठार झाला. तो भारताच्या रक्षणासाठी लढत नव्हता, हे ओवैसी का सांगत नाहीत ?
  • सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथित क्षमेचा उल्लेख करून त्यांची अवहेलना करणार्‍या ओवैसी यांना मुत्सद्दीपणा कशाशी खातात, हे तरी ठाऊक आहे का ? अशा मूर्खांच्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कात्रजचा घाट दाखवला होता ! अशी वक्तव्ये करणार्‍या ओवैसी यांच्या बुद्धीची क्षमता किती आहे, हे लक्षात येते !