|

नाशिक – शरणपूर रस्त्यावरील एका खासगी शिकवणीवर्गात परप्रांतीय शिक्षकांनी मराठी भाषेचा अवमान केला. येथे ‘मराठीत शिकवणार नाही. शिकायचे असेल, तर हिंदीतच शिका’, असे एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना दरडावून सांगितल्याचा आरोप आहे. मराठीत शिकवण्यास नकार देत शिक्षकांनी मराठी भाषेला ‘गावठी’ म्हणून हिणवले. संबंधित घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी शिकवणीवर्गात जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला आणि मराठी बोलण्यास विरोध करणार्या दुष्प्रवृत्तींचा निषेध केला.
या वादाच्या वेळी मारहाण आणि गदारोळ झाल्याचा आरोप करत शिकवणीवर्ग व्यवस्थापकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. मनसे कार्यकर्त्यांनी ७ दिवसांत परप्रांतीय शिक्षकांची त्यागपत्रे घेऊन त्यांच्या जागी मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे, अन्यथा मनसे पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ५ पदाधिकार्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान करणे, हे अत्यंत खेदजनक आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्या शिक्षकांनी भाषेचा द्वेष करणे अशोभनीय आहे. मराठी भाषेचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! भाषेचा स्वाभिमान रक्षण्यासाठी समाजबांधवांनी जागृत रहाणेही तितकेच आवश्यक आहे ! |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक