(म्हणे) ‘आमचे शिर छाटले गेले, तरीही आम्ही दुर्गादेवी, सरस्वतीदेवी यांच्या ओळी गाणार नाही !’ – Maulana Sajid Rashidi

‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे ‘वन्दे मातरम्’वरून विधान !

मौलाना साजिद रशिदी

नवी देहली – केंद्रशासनाने राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्यानंतर त्याला मुसलमानांकडून विरोध केला जात आहे. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी ‘वन्दे मातरम्’ची सर्व ६ कडवी गाण्याला विरोध केला आहे. त्यांनी म्हटले, ‘आम्ही शिर छाटून घेऊ शकतो; परंतु राष्ट्रीय गीताच्या त्या (‘माता दुर्गा’ आणि ‘माता सरस्वती’ यांचा उल्लेख असणार्‍या) विशिष्ट ओळींचे गायन करणार नाही.’

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ वर्ष १९३७ पासून वादग्रस्त !

वृत्तसंस्थेशी बोलतांना मौलाना साजिद रशिदी यांनी सांगितले की,

१. ‘वन्दे मातरम्’ वर्ष १९३७ पासून वादाचा विषय राहिला आहे. वर्ष १९३७ मध्ये त्या काळातील प्रमुख नेते मौलाना अबुल कलाम आझाद आणि हुसैन अहमद मदनी यांनी काँग्रेसला पत्र लिहून ‘वन्दे मातरम्’मधील काही ओळी मुसलमान समुदायाच्या धार्मिक श्रद्धेविरुद्ध असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर काँग्रेसने ठराव संमत करून त्या काही ओळी वगळल्या. (काँग्रेसच्या याच मानसिकतेमुळे भारतात धर्मांध मुसलमान शेफारले आणि राष्ट्रघातकी कृत्य करू लागले ! – संपादक)

२. वर्ष २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयात ‘वन्दे मातरम्’च्या पठणावेळी कुणी उभे राहिले नाही, तरी त्याला देशद्रोही मानले जाणार नाही’, असे नमूद करण्यात आले होते. (सोयीनुसार न्यायालयाच्या निर्णयाचा वापर करणारे मुसलमान ! श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मुसलमानांच्या विरोधात गेल्यावर तो नेहमीच नाकारतात, यावरून हे लक्षात येते ! – संपादक)

३. राष्ट्रीय गीताच्या ज्या ओळींमध्ये देशाला ‘माता दुर्गा’ आणि ‘माता सरस्वती’ असे संबोधले आहे, त्या आमच्या धार्मिक श्रद्धेविरुद्ध आहेत. (असे मुसलमान कधीतरी सर्वधर्मसमभाव पाळतील का ? यावरून ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’चे थोतांड स्पष्ट होते ! – संपादक) मुसलमान स्वतःचे प्राण देऊ शकतात; परंतु धार्मिक श्रद्धेशी तडजोड करू शकत नाहीत. कुणी आमच्यावर असा आदेश लादण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही.

‘ए.आय.एम्.आय.एम्.’चाही विरोध

‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी सांगितले की, मी ‘वन्दे मातरम्’चा आदर आणि सन्मान करतो; परंतु ‘ते म्हणणे अनिवार्य आहे’, असे सांगणे राज्यघटनाविरोधी आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे म्हणतात की, ‘तुम्ही ‘वन्दे मातरम्’ म्हटले नाही, तर तुम्ही देशविरोधी आहात’, हे चुकीचे आहे. आम्ही राष्ट्रगीत आनंदाने म्हणतो. इतर सर्व सूत्रांपासून लक्ष विचलित केले गेले आहे.

संपादकीय भूमिका

  • मातृभूमीचे वंदन करण्यापेक्षा धर्माचा विचार करून स्वतःचा प्राण देण्यास सिद्ध असणारे असे मुसलमान कधीतरी देशाशी एकनिष्ठ असतील का ?
  • भारताशी फाळणी करून मुसलमानांसाठी पाकिस्तान दिल्यानंतरही देशात राहिलेले मुसलमान भारताच्या संस्कृतीच्या विरोधात वागत असल्याने त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे !
  • ‘जन गण मन’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ राष्ट्रगीत करण्याची मागणी आता हिंदूंनी केली पाहिजे !