पाकच्या दबावापुढे अमेरिका झुकली !

नवी देहली – अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ कार्यालयाने ७ फेब्रुवारीला त्याच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून भारताचा नकाशा प्रसिद्ध केला होता. या नकाशात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हे भारताचे भाग असल्याचे दाखवण्यात आले होते; मात्र आता हा नकाशा हटवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या राजनैतिक दबावानंतर अमेरिकी कार्यालयाला हा नकाशा हटवावा लागल्याचे वृत्त आहे.
The Map War: Diplomacy vs. Reality 🗺️👊
The U.S. Trade Representative removes a map showing PoK as part of India, seemingly bowing to pressure from Pakistan.
Let’s be real: as long as the ground reality remains unchanged, these "Map Wars" will persist.
Digital borders are… https://t.co/33qNJlNsEJ pic.twitter.com/o4YLvF0P2e
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 12, 2026
पाकने इस्लामाबादमधील अमेरिकी दूतावास आणि वॉशिंग्टनमधील ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ कार्यालय या दोन्ही ठिकाणी आपला निषेध नोंदवला होता. पाकच्या अधिकार्यांनी अमेरिकेला सांगितले की, हा नकाशा अमेरिकेच्या जुन्या भूमिकेच्या विरोधात आहे.
अमेरिकेने भारताचा नकाशा पहिल्यांदा प्रसारित केल्यानंतर भारतात अनेकांनी याचे स्वागत केले होते. यामुळे अमेरिकेच्या धोरणात मोठा पालट झाल्याचे मानले जात होते; मात्र नकाशा हटवल्यानंतर आता यावर चर्चा चालू झाली आहे.
ही वाचा आधीची बातमी → Indian Map : `अमेरिकेने प्रसारित केलेल्या नव्या नकाशामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारतात दाखवले !
संपादकीय भूमिकाअशा घटना घडणे, यात काय आश्चर्य ! जोपर्यंत भारत सैनिकी युद्ध करून पाकव्याप्त काश्मीरची भूमी नियंत्रणात घेत नाही, तोपर्यंत ‘नकाशाचे युद्ध’ चालूच रहाणार ! |
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी