अमेरिकेच्या भूमिकेत झाला पालट !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीरचा भाग, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरसह चीनकडून दावा केला जाणारा अक्साई चीन हा प्रदेश देखील भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारताचा नकाशा भारत-अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराच्या अधिकृत संवादाचा भाग म्हणून प्रसारित करण्यात आला आहे.
Significant shift in diplomacy! 🌍🇺🇸🇮🇳
The US includes PoK and Aksai Chin in India's map! 📍🇺🇸🇮🇳
✅ Sign of strengthening bilateral ties.
✅ Major shift in international recognition.
The focus now remains on India’s strategy to regain full control over these regions. 🇮🇳✨… pic.twitter.com/1o6SOHgKNK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2026
यापूर्वी अमेरिका किंवा त्यांच्या ‘स्टेट डिपार्टमेंट’कडून प्रसारित करण्यात आलेल्या नकाशामध्ये पाकव्याप्त काश्मीरला पाकमध्ये दाखवण्यात आले होते. यामुळेच जगाचे लक्ष या नकाशाने वेधले आहे.
भारताने वारंवार घेतलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत चीनने नेहमीच या वादात असलेल्या ‘अक्साई चीन’ या भूभागावर त्याचा दावा सांगितला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट आणि इतर जागतिक संस्था यांच्या नकाशांवरील भारताच्या सीमांच्या, विशेषकरून जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा चुकीच्या दाखवत असल्याबद्दल सातत्याने आक्षेप नोंदवला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने प्रसारित केलेला नकाशा पाक आणि चीन यांना बाजूला सारत भारताला महत्त्व देत असल्याचे दर्शक आहे.
संपादकीय भूमिकाभारत-अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा रुळावर येत असल्याचे हे चिन्ह असल्याचे म्हटले जाऊ शकते. मुळात भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन यांना पुन्हा ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखून त्यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे ! |
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !