संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील माहिती

न्यूयॉर्क (अमेरिका) – जैश-ए-महंमदने ९ नोव्हेंबर २०२५ या दिवशी नवी देहलीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बाँबस्फोटांसह अनेक आक्रमणांचे दायित्व स्वीकारले आहे, असे एका सदस्य देशाने सांगितले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी अहवालात दिली आहे. या स्फोटात १५ लोक ठार झाले होते.
१. ८ ऑक्टोबर २०२५ या दिवशी जैश-ए-महंमदचा नेता मसूद अझहर याने ‘जमात-उल-मुमिनत’ नावाच्या महिला शाखेची स्थापना करण्याची औपचारिक घोषणा केली. या नवीन संघटनेचा स्पष्ट उद्देश आतंकवादी आक्रमणांना पाठिंबा देणे होता, हा गटाच्या भरती आणि समर्थन धोरणांमध्ये पालट दर्शवत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
२. आतंकवादविरोधी दबाव असूनही ‘जैश-ए-महंमद’सारखे गट नवीन भरती मॉडेल्स किंवा प्रतीकात्मक, प्रभावी आक्रमणांद्वारे अनुकूलता दर्शवत आहेत, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख पथकाने दिली आहे.
३. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जरी काही आतंकवादी संघटना दुर्बल झाल्या किंवा विखुरल्या असल्या, तरी नवीन रूप देण्यासाठी, पुनर्स्थापित करण्याची आणि उच्च लक्ष्यांवर आक्रमण करण्याची त्यांची क्षमता प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी एक गंभीर धोका आहे.
४. संयुक्त राष्ट्रांच्या देखरेख गटाने आतंकवादाच्या सध्याच्या स्थितीवरही प्रकाश टाकला आहे. काही देश जैश-ए-महंमदला सक्रीय आणि कारवाईदृष्ट्या धोकादायक मानतात, तर दुसर्या सदस्य देशाने असे म्हटले आहे की, ही संघटना निष्क्रीय झाली आहे, यामुळे गुप्तचर मूल्यांकन आणि कारवाईतील सततचा भेद अधोरेखित होतात.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक