चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘पंजाब नॅशनल बँके’चे निवृत्त उप महाव्यवस्थापक दिनेश शर्मा यांची १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक झाली. शर्मा यांना प्रथम एका व्हाट्सअॅप गटात जोडण्यात आले. त्यांना अत्यधिक व्याजातून मिळालेले परतावे दाखवण्यात आले. यावर विश्वास टाकत शर्मा यांनी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची घोटाळेबाजांकडे गुंतवणूक केली आणि त्यात ते पुरते फसले.
🚨 Cyber Fraud Alert! 🚨
Aligarh : Dinesh Sharma, a retired DGM of Punjab National Bank lost ₹1.10 Cr to scammers promising "great returns". 📉
Even high-ranking banking experts aren't immune to "high return" investment scams. If a veteran banker can be targeted, we all must… pic.twitter.com/QUVJGwPCRY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2026
१. अलीगड येथील निवृत्त बँकिंग व्यावसायिक दिनेश शर्मा आरंभीला सावध होते; परंतु सायबर गुन्हेगारांनी त्यांना चांगल्या परताव्याचे आश्वासन देऊन जाळ्यात अडकवले.

२. गुन्हेगारांनी प्रथम त्यांना ३०-४० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देणारा संदेश पाठवला. त्यानंतर त्यांना एका व्हाट्सअॅप गटामध्ये जोडले गेले. गटामधील अनेक लोक चांगला परतावा मिळाल्याचा दावा करत होते.
|
३. फसवणूक करणार्यांनी शर्मा यांना एका छोट्या ठेवीपासून आरंभ करण्यास सांगितले. त्यानंतर शर्मा यांनी आरंभी ५ सहस्र रुपये ट्रान्सफर केले. या पैशांचा त्यांना मोठा परतावा मिळाल्याचे दाखवण्यात आले.
४. नफा पाहून शर्मा अधिकाधिक आकर्षित होत गेले. घोटाळेबाजांनी शर्मा यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना मोठी गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यामुळे शर्मा यांनी १ कोटी १० लाख रुपये गुंतवले. त्यानंतर घोटाळेबाजांनी आणखी ३ कोटी रुपयांची मागणी केली. शर्मा यांना संशय आल्यावर त्यांनी कुटुंबियांना याविषयी माहिती दिली.
५. त्यानंतर त्यांना स्वतःची सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाभारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या बँकेतील उच्चपदस्थ निवृत्त अधिकार्याची अशा प्रकारे फसवणूक होते, यावरून लोकांनी किती सतर्क रहायला हवे, हेच यातून दिसून येते ! |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा