
‘मुसलमान जगभरातील त्यांच्या पंथाच्या असलेल्या ५१ देशांत जाऊ शकतात; मात्र हिंदूंवर आक्रमण झाल्यास जगाच्या पाठीवर एकही देश नसल्याने त्यांना सागराला जवळ केल्याविना पर्याय उरणार नाही’, असे वक्तव्य विविध भाषणांतून हिंदूंनी ऐकलेले असते. जसा लव्ह जिहाद गळ्यापर्यंत आल्यावर त्याचे गांभीर्य लक्षात आले आणि तो न मानणारे लोकही अंतिमतः तो मान्य करू लागले, तसे अद्याप ‘भूमी जिहाद’चे गांभीर्य म्हणावे तेवढे लोकप्रतिनिधींच्या लक्षात आलेले नाही, असे खेदाने म्हणावे लागते. सध्याची ताजी घटना नवी मुंबईतील खारघर येथील आहे. गेले काही दिवस तळोजा येथील मुसलमान खारघर येथील हिंदु तरुणांवर आक्रमण करून दहशत निर्माण करत आहेत. त्यांचा मूळ हेतू तेथील हिंदु कोळ्यांच्या भूमी हडप करणे, हा आहे. तळोजाच्या मुसलमानांनी येथील कोळ्यांच्या व्यवसायाच्या भूमीवर गोवंशियांचे मांस आणि त्यांचे त्याज्य पदार्थ इत्यादी आणून टाकणे चालू केले. त्यामुळे पारंपरिक कोळ्यांनी तेथून चालणारा वडिलोपार्जित मासे विकण्याचा व्यवसाय बंद केला आणि तेथे जाणे बंद केले. केवळ एका हिंदु कोळ्याच्या घरातील २ शूर भावांनी त्यांचा तेथील व्यवसाय चालू ठेवला आहे. याचा राग मनात धरून वारंवार संबंधित कोळी समाजातील भावांवर मुसलमान प्राणघातक आक्रमण करत आहेत. या वेळी जवळजवळ २५ मुसलमान त्यांच्यावर धावून गेले. त्यांपैकी काही जणांकडे तलवारी, चॉपर आणि दंडुके होते. यापूर्वी त्यांनी त्यांच्या आईला मुलांना मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही रामनवमीला याच मुलांशी काही कारणाने वाद उकरून काढून त्यांनी भांडण केले. त्या वेळी त्यांची आई पोलीस ठाण्यात गेल्यावर तिच्याकडून अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचे तिने व्हिडिओत सांगितले. तिने १० तक्रारी करूनही पोलिसांनी काही कारवाई केली नाही. ‘पोलीस सर्व घटना हलक्यात घेतात’, असे येथील स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे. ही घटना थोडी सविस्तर सांगितली; कारण ही प्रातिनिधिक आहे. जेव्हा धर्मांधांची संख्या वाढते आणि ते ठराविक परिसरातून हिंदूंना हाकलायचे ठरवतात, तेव्हा तेथे मांस, जनावरांचा टाकाऊ कचरा आदी टाकणे, मुलींना सर्व प्रकारचे त्रास देणे, भोंगे लावणे, हिंदूंच्या गाड्या फोडणे आदी विविध क्लृप्त्या योजून हिंदूंचे जिणे नकोसे करतात आणि मग हिंदू त्रासाला कंटाळून तेथून पलायन करतात. गुजरात, राजस्थान, देहली या राज्यांतील भागांप्रमाणेच मुंबईतील मालवणीतूनही हिंदूंनी पलायन केले आहे. ही सूची मोठी आहे. रेल्वे खालोखाल देशातील सर्वांत मोठी भूमी वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत आहे. काँग्रेसने तशी ती जाण्यासाठी कायद्यात अनुकूल पालट त्यांना करून दिला आणि त्या विरोधात लढण्याची वाटही बंद करून हिंदूंची पुरती मुस्कटदाबी केली. त्याचा परिणाम भारतातील २ क्रमांकाची होईल एवढी भूमी जिहाद्यांच्या कह्यात आहे.

विदेशात कुठेही अशा प्रकारे मुसलमानांची अनधिकृत बांधकामे आढळून येत नाहीत, जशी भारतात आढळतात. सर्व क्षेत्रांत विदेशी गोष्टीचे अनुकरण होत असतांना याचे का होत नाही ? २ वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हा विषय उचलला. तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ‘बुलडोझर’ कारवाई करतात; म्हणून देशभरातील निधर्मी आणि मुसलमान त्यांच्या नावाने बोटे मोडतात; पण याचाच अर्थ ‘एवढ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करून मुसलमानांनी भूमी बळकावलेली आहे’, हेच यातून सिद्ध होते. प्रत्येक रेल्वेस्थानकाच्या आणि मंदिराच्या बाजूला असणार्या हिरवी चादर पांघरलेल्या थडग्यांपैकी एक तरी अधिकृत आहे का ? पाच पातशाह्यांना तलवारीचे पाणी पाजणार्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातील सर्वच गडांवर किंवा शेजारी अशी थडगी किंवा मशिदी आहेतच ! मुंबईतील मालवणी भागातून हिंदूंना पलायन करावे लागले आहे; परंतु तिथे बुलडोझर चालवला जाण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागली. असे असतांना एखाद्या वसाहतीने येथे अन्य पंथियांना जागा न विकण्याचा निर्णय घेतला, तर त्यावर साम्यवादी माध्यमे तोंडसुख घेतात. ‘मुसलमानांनी कुराणानुसार चालायचे आणि हिंदूंनी मात्र निधर्मी राज्यघटनेनुसार चालायचे’, अशी विचारसरणी आपल्यावर थोपवली गेली आहे. त्यामुळे हिंदूंचा येनकेन प्रकारेण छळ आणि स्थलांतर करून वर्ष २०४७ पर्यंत ‘गजवा-ए-हिंद’ (जगावर मुसलमानांचे राज्य) स्वप्न ते उराशी बाळगून आहेत. त्यांना लोकसंख्या जिहादासमवेत अन्य सर्व जिहादांचे माध्यम उपलब्ध आहे. पोलीस हिंदु असूनही हिंदूंना नाकीनऊ आणत आहेत आणि हिंदूंचे संघटन अन् दबाव अल्प पडत आहे. तो पोकळ घराचा वासा झाला आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. सहस्रोंच्या संख्येने हिंदूंनी मोर्चे काढले; पण ना लव्ह जिहाद थांबला, ना भूमी जिहाद, ना लोकसंख्या जिहाद, ना थूक जिहाद ! जिहाद्यांना ना पोलिसांचा धाक आहे, ना राज्यकर्त्यांचा ! हे सत्य हिंदूंनी समजून घेऊन वेळीच जागृत झाले पाहिजे. ज्या ज्या ठिकाणाहून हिंदूंना पलायन करावे लागत आहे, ते ज्यांच्यामुळे करावे लागत आहे, त्यांच्यावर तात्काळ अजामीनपात्र गुन्हे नोंद झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली पाहिजे.
सत्ताधार्यांनी हिंदूंना सुरक्षित करावे !
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तेथील ८०० अनधिकृत मदरसे बंद केले. असे सर्व राज्यांत कधी होणार ? अनधिकृतरित्या भूमी हडप केल्या जाणार्या कायद्याची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचे मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले होते. त्याचा उद्देश धार्मिक फसवणुकीतून होणार्या भूमी जिहादला रोखणे असा असल्याचे म्हटले जाते. या विषयावर अभ्यासासाठी आणि कडक कायद्याच्या शिफारशींसाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती; पुढे तिचे काय झाले लक्षात आले नाही. आता प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह मुंबईच्या होणार्या महापौर रितु तावडे यांनी मुंबईतील बांगलादेशींच्या विरोधात एल्गार पुकारण्याचे आश्वासन दिले आहे. नवी मुंबईतही भाजपच्याच महापौर सुजाता पाटील या सूत्र हाती घेणार आहेत. त्यांनी नवी मुंबईतील वरील घटना गांभीर्याने घेऊन खारघर भागातील समस्त कोळी परिवारांना त्यांचा व्यवसाय करण्यासाठी त्यांची मूळ भूमी उपलब्ध होण्यासाठी त्यांची भूमी हडप केलेल्या सर्व भूमी जिहाद्यांवर कडक कारवाई करावी. इतकेच नव्हे, तर त्यांना घाबरून तेथून स्थलांतर केलेल्या कोळी बांधवांना तेथे परत आणून बसवावे आणि सुरक्षा पुरवावी. असे केले, तर हिंदूंमध्ये भाजप आणि महापौर दोघांवरील विश्वास वाढून त्यांच्या मनात त्यांच्याविषयी स्थान निर्माण होईल. असे केले, तरच हिंदू स्वतःला सुरक्षित अनुभवतील. अन्यथा ‘सत्ता कुणाचीही येवो, हिंदू मात्र असुरक्षितच’, अशी स्थिती होईल. ती न होण्यासाठी निदान ज्या नागरी स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे, तिथे तरी त्यांनी हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी माफक अपेक्षा !
| हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडणारा भूमी जिहाद रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस कारवाया कराव्यात ! |
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
Corporate Jihad : धर्मांतरास नकार दिल्याने ‘Wipro’च्या हिंदु महिलेला नोकरीवरून काढले !
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !