फरीदाबाद (हरियाणा) येथील नीमका कारागृहातील घटना

फरीदाबाद (हरियाणा) – येथील नीमका कारागृहात बंद असलेला आतंकवादी अब्दुल रहमान याची ८ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. कारागृहातच बंद असलेला अरुण चौधरी नावाचा बंदीवानाने ही हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रहमानच्या डोक्यावर तीक्ष्ण वस्तूने वार करण्यात आले. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही हत्या आतंकवादी कारवायांशी संबंधित आहे कि वैयक्तिक वैरातून घडली, याचे अन्वेषण चालू आहे.
अब्दुल रहमानला मार्च २०२५ मध्ये हरियाणातील पलवल येथून अटक केली करण्यात आली होती. त्याच्याकडून २ हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. तो मूळचा उत्तरप्रदेशातील अयोध्येचा रहिवासी होता. तो ‘इस्लामिक स्टेट खोरासान’शी संबंधित होता. अब्दुल रहमान आणि त्याचा साथीदार सुफियान यांना अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत अयोध्येत आतंकवादी आक्रमण करण्याचा कट उघडकीस आला होता. आरोपी अरुण चौधरी यालाही आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याने अटक करण्यात आली होती.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !