
जालंधर (पंजाब) – आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) नेते लक्की ओबेरॉय (वय ५२ वर्षे) यांची ६ फेब्रुवारीच्या सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ओबेरॉय मॉडेल टाऊन परिसरात गुरुद्वारात दर्शनासाठी आले होते. ते तेथून बाहेर पडून त्यांच्या चारचाकी गाडीत बसू लागले, तेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. कुटुंबियांनी त्यांना गंभीर अवस्थेत मॉडेल टाऊन येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबाला त्यावर विश्वास बसला नाही; म्हणून त्यांनी त्यांना शहरातील श्रीराम रुग्णालयात नेले. तेथेही त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Shocking news from Punjab
Jalandhar: Lucky Oberoi, a leader from the ruling AAP, has been shot dead outside a Gurudwara. 🚨
If the state's own ruling party leaders aren't safe, what is the fate of the common man? The law and order situation is deeply concerning. 📉⚖️
PC: ND24… pic.twitter.com/H6WZRaE1Pd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2026
अतिरिक्त पोलीस उपायुक्त जयंत परी यांनी सांगितले की, पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली आहे. ‘सीसीटीव्ही’चे छायाचित्रण पडताळले जात आहे. आक्रमणकर्त्यांना अटक करण्यासाठी धाडी घातल्या जात आहेत. पोलीस अधिकार्यांचे म्हणणे आहे की, प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे आणि लवकरच आरोपींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाईल.
#WATCH | Punjab | AAP's Lucky Oberoi shot dead in Jalandhar.
Dr Vishal, Sri Ram Hospital, says, "Lucky Oberoi was brought here around 8 am. On examination, it was found that 8-9 rounds were fired at him. He was given CPR and also put on a ventilator, but his life could not be… https://t.co/Zd6PT8A7kD pic.twitter.com/rgjbksE4V9
— ANI (@ANI) February 6, 2026
संपादकीय भूमिकासत्ताधारी पक्षाचे नेतेच जिथे सुरक्षित नसतील, तिथे तेथील सामान्य लोकांचे रक्षण कसे होत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !