
इंदूर – येथील अहिल्या विद्यापिठात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित ‘नर्मदा साहित्य मंथन कार्यक्रमां’तर्गत सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासू आणि साहित्यप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या ग्रंथप्रदर्शनात ठेवण्यात आलेले सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स हे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.
वैशिष्ट्यपूर्ण

१. याप्रसंगी अयोध्येहून आलेले आचार्य मिथिलेश नंदिनी शरण महाराज, तसेच ‘स्वदेश’ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक अन् संपादक श्री. विवेक गोरे यांनी प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. या दोघांनी सनातनच्या ग्रंथांची, तसेच ‘सनातन पंचांग’ची प्रशंसा केली.
२. रा.स्व. संघाच्या इंदूर शहरांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील नगर प्रचारप्रमुख श्री. पंकज महाडिक यांनी ‘ग्रंथांच्या माध्यमातून सनातन विचारांचा प्रसार करणे चांगले आहे’, असे सांगितले. या वेळी ते अनेक परिचितांना ग्रंथप्रदर्शन बघण्यासाठी घेऊन आले.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ