बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीब यांचे आवाहन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी जनतेला निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. सजीब यांनी म्हटले आहे की, बांगलादेशामध्ये १२ फेब्रुवारी या दिवशी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीत उघडपणे पक्षपात दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या निवडणुकीपासून दूर रहावे आणि मतदान करू नये. या निवडणुकीत शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाला लढण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. या निर्णयामुळे ‘अवामी लीग’च्या नेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
१. एका कार्यक्रमात ‘व्हिडिओ कॉल’द्वारे बोलतांना सजीब म्हणाले की, बांगलादेशामध्ये प्रत्यक्षात आतंकवादीच राज्य करत आहेत. देशात सातत्याने निरपराध नागरिकांची हत्या होत आहे. ‘अवामी लीग’चे कार्यकर्ते आणि नेते यांच्यावर अमानुष अत्याचार केले जात आहेत.
२. सजीब यांनी सांगितले की, बांगलादेशामध्ये केवळ ‘अवामी लीग’लाच निवडणूक लढवण्यापासून रोखलेले नाही, तर सर्व प्रगतीशील पक्षांवरही बंदी घातली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ तमाशा ठरणार आहे.
३. या निवडणुकीत आधीच ‘बी.एन्.पी.’ला १५० जागा आणि ‘जमात-ए-इस्लामी’ ला १३० जागा मिळणार असल्याचे ठरवले गेले आहे. निकाल आधीच निश्चित आहेत.
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले