Saudi Trolls UAE Muslims : सौदी अरेबियातील धर्मांध मुसलमानांकडून संयुक्त अरब अमिरातच्या मुसलमानांचा ‘भारतीय’ म्हणून कुत्सितपणे उल्लेख !

भव्य मंदिर बांधण्यावरून टीका करणार्‍या सौदीतील धर्मांधांना संयुक्त अरब अमिरातच्या मुसलमानांनी फटकारले

दुबई – येमेनपासून सुदानपर्यंत प्रभाव वाढवण्याच्या सूत्रावरून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये स्पर्धा चालू आहे. या दोन्ही देशांमध्ये अधूनमधून वाद उफाळून येत असतो. आताही असाच वाद झाला असून सौदी अरेबियातील सामाजिक माध्यमांचा वापर करणार्‍यांनी संयुक्त अरब अमिरातसह भारतालाही लक्ष्य केले आहे. सौदीच्या नागरिकांनी संयुक्त अरब अमिरातच्या नागरिकांचा उल्लेख ‘भारतीय’ असा कुत्सितपणे केला आहे. भारतीय म्हणजेच हिंदू हे मूर्तीपूजक असतात. त्यामुळे अमिरातच्या नागरिकांना ‘भारतीय’ म्हणून त्यांच्या मुसलमान असण्याच्या अस्तित्वावर आघात करण्याचा प्रयत्न सौदीतील लोकांनी केला आहे. यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे संयुक्त अरब अमिरातच्या अनेक नागरिकांनी भारताची बाजू घेऊन सामाजिक माध्यमांवर सौदी अरेबियातील धर्मांध नागरिकांचा समाचार घेतला आहे.

१. संयुक्त अरब अमिरातचे एक प्रतिष्ठित नागरिक अमजद तहा यांनी ‘एक्स’वर लिहिले, ‘आम्हाला ‘भारतीय’ म्हणून ओळखले जाणे, हा आमचा अपमान वाटत नाही. भारत ही मानवी इतिहासातील महान संस्कृती आहे. भारताने जगाला तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक वारसा दिला आहे. आम्ही भारतासोबत पुढे चाललो आहोत आणि भारताचा सन्मान करतो.’

२.  संयुक्त अरब अमिरातचे आणखी एक नागरिक रौदा अल्तेनैजी यांनी लिहिले, ‘भारतियांशी असलेले आमचे नाते कोणत्याही अपमानास्पद टिपणीपेक्षा अधिक खोल आहे. आमच्याकडे भव्य हिंदु मंदिर आहे आणि ते बरेच काही सांगून जाते. सन्मान आणि आपुलकी दोन्ही बाजूंनी आहेत; दशकानुदशकांच्या विश्वासावर आणि मानवी नात्यांवर त्या उभ्या आहेत. हे नाते सामाजिक माध्यमांवरील अपमानापेक्षा अधिक दृढ आहे.’