अडीच वर्षांत २ महापौर, २ उपमहापौर मिळणार

अहिल्यानगर – शहराच्या दहाव्या महापौर म्हणून प्रभाग तीनच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ज्योती गाडे यांना संधी दिली आहे, तर उपमहापौर पदावर भाजपकडून नगरसेवक धनंजय जाधव यांची वर्णी लागली आहे. दोघांचीही बिनविरोध निवड झाली असून ६ फेब्रुवारीला त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल. सव्वा-सव्वा वर्षांसाठी या निवडी असतील. अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच महापौर पद राहील, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केले; मात्र महापौर पदासाठी आम्ही आशावादी आहोत, असे सांगत पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद भाजपकडे राहील, असे संकेतही मंत्री विखे यांनी दिले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यात उमेदवारांची नावे घोषित होऊन दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या दोघांचेच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालकमंत्री विखे म्हणाले की, स्थायी समिती सभापती, महिला आणि बालकल्याण समिती सभापती, तसेच उपसभापती, सभागृह नेतेपदाविषयी सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप निर्णय घेतील. महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष न करता साधेपणाने औक्षण करून ज्योती गाडे यांचे घरी स्वागत करण्यात आले.
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !