९.१.२०२६ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांच्या सूनबाई, सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या निधनापूर्वी, निधनाच्या वेळी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. निधनापूर्वी
१ अ. सासूबाईंची सेवा करतांना रात्री जागरण होऊनही थकवा न जाणवता चैतन्य जाणवणे : ‘८.१.२०२६ या दिवशी रात्री माझ्या सासूबाईंचा श्वासोच्छ्वास वेगाने होत होता. त्यामुळे त्या रात्री मी झोपले नव्हते, तरी दुसर्या दिवशी मला थोडाही थकवा जाणवला नाही. असा त्रास त्यांना मागील २ – ४ मासांपासून अधूनमधून होत होता; पण त्यांची सेवा करतांना मला कधी थकवा जाणवायचा नाही, तर उत्साह आणि चैतन्य जाणवायचे. त्यांचे निधन झाल्यानंतरही काही दिवस मला झोप लागली नाही, तरीही दुसर्या दिवशी मला थकवा न येता चैतन्य आणि आनंद जाणवत असे.
१ आ. सासूबाईंचा त्रास पुष्कळ वाढल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र धरणे, तेव्हा ‘त्या छायाचित्राकडे पाहून बोलत आहेत’, असे जाणवणे : ९.१.२०२६ या दिवशी मी आणि सहसाधिका ((सुश्री) वैशाली बांदिवडेकर) नेहमीप्रमाणे सकाळी सासूबाईंचे अंग पुसण्याची सेवा करत होतो. तेव्हा त्यांना अधिकच त्रास होऊ लागला; म्हणून आम्ही त्याचे अंग पुसणे थांबवले. हळूहळू त्यांच्या श्वासाची गती वाढू लागली. आम्ही त्यांच्या पलंगाच्या चारही बाजूंना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे ठेवली होती. आम्ही मधे मधे सासूबाईंच्या डोळ्यांसमोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र धरून नामजप करत होतो. त्या वेळी छायाचित्राकडे पाहून ‘सासूबाई जणू त्यांच्याशी बोलत आहेत’, असे मला जाणवत होते.
१ इ. सासूबाई ‘स्थिर आणि शांत आहेत’, असे जाणवणे : नंतर आम्ही आश्रमातील वैद्या (सुश्री) माया पाटील यांना बोलवले. त्यांनी सासूबाईंची नाडी पाहिली. तेव्हा त्यांची नाडी अगदी मंद झाली होती आणि श्वास संथपणे चालू होता. तेव्हाही ‘सासूबाई स्थिर आणि शांत आहेत’, असे मला जाणवत होते.
१ ई. ‘सासूबाईंनी सर्वांवर दृष्टी फिरवल्यावर ‘त्या पूर्ण समाधानी आहेत’, असे जाणवणे : अकरा वाजता आमचे नातेवाईक, म्हणजे दीर आणि जाऊबाई आले होते. तेव्हा सासूबाईंनी सगळ्यांवरून दृष्टी फिरवली. तेव्हा त्यांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ‘त्या पूर्ण समाधानी आहेत’, असे मला जाणवले. त्या आम्हाला ‘तुम्ही सगळे असेच एकत्र रहा’, असे त्यांच्या दृष्टीतून सांगत आहेत’, असे मला जाणवत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिलेला प्रसाद साधिकेने सासूबाईंना भरवल्यावर ‘जणूकाही देवीनेच त्यांना प्रसाद भरवला’, असे वाटणे

७.१.२०२६ या दिवशी भक्तीसत्संग होता. त्या दिवशी ‘आपण करत असलेल्या सेवेविषयी आत्मनिवेदन करूया’, असे मला वाटले आणि देवानेच माझ्याकडून ते करून घेतले. ९.१.२०२६ या दिवशी मला एका साधिकेकडून समजले की, ‘भक्तीसत्संगात केलेल्या आत्मनिवेदनासाठी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी प्रसाद पाठवला आहे.’ हे ऐकताच माझी भावजागृती होऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. तेव्हा ‘हा प्रसाद सासूबाईंना भरवूया’, असे मला वाटले. एका साधिकेने त्यांना प्रसादाचा कण भरवल्यानंतर ‘जणूकाही देवीनेच सासूबाईंना प्रसाद भरवला’, असे मला वाटले.
३. देवाच्या अनुसंधानात असतांना सासूबाईंनी अंतिम श्वास घेणे
काही वेळानंतर सासूबाईंच्या श्वासाची गती हळूहळू मंदावत गेली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्या वेळी सासूबाई स्थिर होत्या. ‘त्या शांत, निर्विचार अवस्थेत अन् देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवत होते.
४. निधनानंतर

अ. सासूबाईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर आश्रमात आलेले नातेवाइक म्हणाले, ‘‘येथे आम्हाला कुणालाच कसलाच त्रास झाला नाही किंवा दाबही जाणवला नाही.’’ त्या वेळी वातावरणात शांतता आणि हलकेपणा जाणवत होता. सर्वांना ‘त्या शांतपणे झोपल्या आहेत’, असे जाणवत होते.
आ. सासूबाईंना स्मशानभूमीकडे घेऊन जात असतांना सर्व जण जयघोष आणि नामजप करत १० – १२ पावले चालत पुढे गेले. त्या वेळी वातावरण चैतन्यमय झाले होते.
इ. ९.१.२०२६ या रात्री मी झोपले असतांना ‘मध्यरात्री कुणीतरी मला स्पर्श केला’, असे मला वाटले; म्हणून मी उठले आणि सभोवताली पाहिले. तेव्हा मला कुणीच दिसले नाही. त्या वेळी ‘सासूबाईंनीच स्पर्श करून मला आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.
ई. काही नातेवाईक देवद आश्रमात प्रथमच आले होते. त्यांना आश्रमातील वातावरण आनंदी आणि उत्साही वाटले.’
– सौ. मीनल राजेंद्र शिंदे (कै. प्रभावती शिंदे यांची सून), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१.२०२६)
| इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आणि संतांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !