२६ जानेवारी या दिवशी भारताला ‘सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ जानेवारी १९५० या दिवशी देश सार्वभौम प्रजासत्ताक बनला; कारण संसदेच्या संविधान सभेने सिद्ध केलेल्या आणि अंतिम केलेल्या राज्यघटनेला मान्यता दिली. यामध्ये कायदा, सामाजिक विज्ञान, अर्थशास्त्र, प्रशासन, कला आणि साहित्य या क्षेत्रांतील अनेक दिग्गजांचा समावेश होता.
२६ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘आणीबाणीच्या काळात मूळ राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांचा समावेश, अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी ‘समाजवाद’ या शब्दाचा राज्यघटनेत अंतर्भाव आणि प्रा. आर्. वैद्यनाथन् यांनी लिहिलेल्या संशोधनात्मक पुस्तकात ‘मंडल आयोगाच्या अहवालाचे सत्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(उत्तरार्ध)
पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1001689.html
९. केवळ गरजू आणि पात्र लोकांनाच आरक्षण देणे, ही काळाची आवश्यकता !
सध्याच्या आरक्षणाच्या शैलीचा कच्चा मार्ग खोडून काढला पाहिजे आणि केवळ गरजू लोकच आरक्षणाच्या अधिकारक्षेत्रात येतील, याची अधिकार्यांनी खात्री केली पाहिजे. जे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पुढे आहेत, त्यांना आरक्षणाच्या कक्षेतून काढले पाहिजे. तो दिवस दूर नाही, जेव्हा उदारमतवादी-समाजवादी-धर्मनिरपेक्ष-इतर मागसवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती यांना गुणवत्ता डावलून शास्त्रज्ञ, अभियंते, वैमानिक, कमांडो आणि अन्वेषण अधिकारी म्हणून आरक्षण देण्याची मागणी केली जाईल.
१०. आरक्षण प्रणालीमुळे वैद्यकीय क्षेत्राचे पावित्र्य नष्ट

धोरणकर्त्यांनी वरील कामांची संवेदनशीलता समजून घेतली पाहिजे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी आरक्षण प्रणाली लागू करून आपण वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य आधीच नष्ट केले आहे. केरळमधील वायनाड येथील ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’त शस्त्रक्रिया झालेल्या एक महिलेच्या पोटात कापसाचा बोळा रहाणे, ही घटना अशा सहस्रो घटनांपैकी एक आहे. ‘कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’त प्रसूती शस्त्रक्रिया झालेल्या आणखी एका महिलेच्या गर्भाशयात लहान सुरी राहिली होती, ती तशीच असतांना तिला परत पाठवण्यात आले. येथे समजून घेतले पाहिजे की, आपण रुग्णांच्या जिवाशी खेळत आहोत. परिस्थिती इतकी खालावली आहे की, रुग्णांनी त्यांना भेटणारे डॉक्टर राखीव श्रेणीचे आहेत कि नाही ? हे विचारायला प्रारंभ केला आहे. त्यासाठी त्यांना दोषी धरले जाऊ शकत नाही. आपण जितक्या लवकर आरक्षण व्यवस्थेचे नूतनीकरण करू, तितके देशासाठी आणि लोकांसाठी चांगले होईल.
विमानाविषयी प्राचीन संशोधन मांडले जाणे आणि ‘भारतीय विज्ञान परिषद’ बंद पडणे यांविषयी…

शास्त्रज्ञांच्या टोळीने भारतीय विज्ञानाचे अपहरण कसे केले, याचा पुरावा म्हणून वर्ष २०१५ मध्ये मुंबईत झालेल्या ‘भारतीय विज्ञान परिषदे’ने हा पुरावा दिला आहे. अनुभवी पायलट आणि उड्डाण प्रशिक्षक कॅप्टन आनंद बोडस यांनी त्यांच्या मुख्य भाषणात ‘वैमानिक शास्त्र आणि प्राचीन भारतात इतर ग्रहांवर उड्डाण करण्यास सक्षम असलेली विमाने कशी होती ?’, याविषयी भाष्य केले. टीकाकारांनी कॅप्टन बोडस यांच्या निष्कर्षांना ‘छद्मविज्ञान’ असे संबोधले आणि वृत्तवाहिन्या अन् वर्तमानपत्रे यांद्वारे त्यांचा अपमान केला. ‘नासा’च्या एका शास्त्रज्ञाने ‘भारतीय विज्ञान परिषदे’च्या आयोजकांना पत्र लिहून ‘कॅप्टन बोडस यांना वार्षिक विज्ञान परिषदेत त्यांचा संशोधन प्रबंध सादर करण्याची अनुमती देऊ नये’, अशी मागणी केली होती. ‘भारतीय विज्ञान परिषद’ ही स्वतः एक मोठी परिषद आहे आणि तिने भारताच्या विकासात कोणत्याही प्रकारे योगदान दिलेले नाही. आयोजकांच्या नकारात्मकतेमुळे भारतीय विज्ञान परिषद स्वतःच बंद पडली, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
– श्री. कुमार चेल्लपन
११. बहुसंख्य हिंदू असलेल्या भारताला ‘हिंदु प्रजासत्ताक’ म्हणून घोषित करावे !
शेवटी ‘भारताला ‘हिंदु प्रजासत्ताक’ म्हणून घोषित केले पाहिजे आणि त्याचे नाव पालटून ‘हिंदुस्थान’ केले पाहिजे. ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदु आहे, या वस्तूस्थितीशी देशाचे अंतर्गत आणि बाह्य शत्रू सहमत आहेत. त्यामुळे देशाला हिंदुस्थान म्हणवून घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. मुसलमानांकडे अनेक इस्लामी प्रजासत्ताक आहेत, तर ख्रिस्ती नेहमीच पाश्चिमात्य देशांकडे त्यांचे आध्यात्मिक मुख्यालय म्हणून पहातात. पाकिस्तानमध्ये सहस्रो हिंदूंची कत्तल झाली असली, तरी भारताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातून जनतेने आरडाओरडा केला नाही. बांगलादेशात हिंदूंची हत्या आणि जाळपोळ केली जात असल्याचे आपण प्रतिदिन वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. भारताच्या व्यतिरिक्त किती देशांनी या हत्यांविषयी बांगलादेश आणि त्याचे हंगामी इस्लामी अध्यक्ष महंमद युनूस यांच्यावर आक्षेप घेतला आहे ? आपले राष्ट्र ‘हिंदु प्रजासत्ताक’ आहे आणि जगात कुठेही हिंदूंवर होणारी आक्रमणे हे भारतावरील आक्रमण मानले जाते, हे जगाला सांगण्याची शक्ती भारतियांकडे असायला हवी.
१२. नवीन पिढीला भारताचा खरा इतिहास शिकवणे महत्त्वाचे !
मोगल आणि इस्लामी शासकांनी केलेल्या हिंदूंच्या कत्तलीसह भारताचा खरा इतिहास देशातील नव्या पिढीला शिकवला पाहिजे. वर्ष १८९७ मध्ये पुण्यातील ‘प्लेग’ साथीच्या आजाराविरुद्धच्या लढ्यात अडथळा आणल्याविषयी ब्रिटीश अधिकारी डब्ल्यू.सी. रँड यांची हत्या करण्यात चापेकर बंधूंनी केलेल्या त्यागाविषयी किती विद्यार्थी आणि तरुण यांना माहिती आहे ? ज्यांनी ब्रिटीश वसाहतवादी राज्यकर्त्यांविरुद्ध लढा दिला आणि अज्ञातवासात मरण पावले, असे अनेक स्वातंत्र्यसैनिक आहेत. केवळ एका कुळातील सदस्यांना (गांधी घराण्यातील) स्वातंत्र्यसैनिक म्हणून चित्रित केले गेले आहे, हे निराशाजनक आहे.
केंद्र सरकारने वेदपाठशाळा आणि गुरुकुल शिक्षणपद्धत यांचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता !

सध्या वेदपाठशाळा आणि गुरुकुल शिक्षणपद्धत, भारताच्या युगानयुगे चालू असलेल्या ज्ञानपद्धतीची आणि वंशाची वैशिष्ट्ये कुठे आहेत ? समाजवादी विचारसरणीच्या येण्यामुळे बंद पडलेली वेदपाठशाळा आणि गुरुकुल व्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना चालू केल्या पाहिजेत. समाजवादाची संकल्पना सपशेल अपयशी ठरली आहे. आयुर्वेद आणि इतर ज्ञानपद्धतींच्या क्षेत्रात संशोधनावर बंदी आहे, हे जाणून घेणे धक्कादायक नाही का ? जे आयुर्वेद वैद्यक प्रणालीच्या परिणामांविषयी बोलण्याचे धाडस करतात, त्यांना ‘हिंदु मूलतत्त्ववादी’ असे संबोधले जाते.
– श्री. कुमार चेल्लपन
१३. राज्यघटनेमध्ये नागरिकांना दर्जा आणि संधी समान असतांना हिंदूंना दुय्यम दर्जाची वागणूक
जरी भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता, सर्वांमध्ये बंधुभाव वाढवणे, व्यक्तीची प्रतिष्ठा अन् राष्ट्राची एकता आणि अखंडता यांची हमी दिली असली, तरी बहुसंख्य समुदाय असलेल्या हिंदूंशी भेदभाव केला जातो, तसेच त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक मानले जाते, हे स्पष्ट सत्य आहे. अल्पसंख्यांक समुदायांना त्यांच्या धार्मिक पुस्तकांच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था चालू करण्याचे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे; पण हिंदूंना मात्र एकटे पाडले गेले आहे. हा भेदभाव दूर झाला पाहिजे. हिंदूंना कोणत्याही प्रकारचा विशेष दर्जा नको असला, तरी अल्पसंख्यांक समुदायांना मिळणारे समान अधिकार आणि स्वातंत्र्य त्यांना मिळाले पाहिजे.
१४. ‘हिंदू हे भारतात घुसखोर आहेत’, असा चर्च प्रमुखांचा कांगावा !
सध्या परिस्थिती धोकादायक टप्प्यावर पोचली आहे. ‘हिंदू हे भारतात घुसखोर आहेत आणि ख्रिस्ती हे उपखंडातील पहिले वसाहती होते’, असा दावा ‘सायरो मलबार चर्च’चे प्रमुख बसेलियोस मार्थोमा मॅथ्यूज-तिसरे करत आहेत. बिशप मॅथ्यूज या मार्क्सवादी सहप्रवासीने दावा केला आहे, ‘भारतातील पहिल्या ख्रिस्ती वसाहतीपेक्षा पुष्कळ काळानंतर हिंदू युरोपमधून भारतात आले.’ सांगण्यासाठी कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या अब्राहमिक धर्मांनी सनातन धर्मासमोर हे आव्हान उभे केले आहे. ‘भारताची प्रगती हिंदूंचे सक्षमीकरण आणि देशाला ‘हिंदु प्रजासत्ताक’ म्हणून घोषित करण्यात आहे. भारताचे भवितव्य हिंदूंनी ठरवायला हवे, कोणत्याही नव्याने आलेल्या आणि अधिकार गाजवणार्यांनी नाही.
(समाप्त)
– श्री. कुमार चेल्लपन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ. (११.१.२०२६)
संपादकीय भूमिकाहिंदूंना विशेष दर्जा नको असला, तरी अल्पसंख्यांकांना मिळणारे समान अधिकार आणि स्वातंत्र्य त्यांना मिळालेच पाहिजे ! |

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump