
बुलढाणा – प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी आणि तिरंग्याचा सन्मान जपण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. चिखली आणि मलकापूर येथे प्रशासकीय अधिकारी अन् पोलीस प्रशासन, तसेच शाळा-महाविद्यालय येथे निवेदने देऊन राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
चिखली येथे समितीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विजय सवडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भूषण गावंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी धर्मप्रेमी सर्वश्री प्रशाद येवले, विजय हरि लहितरकर, स्वप्नील देशमुख, गणेश चव्हाण, नचतम गुप्ता, सचिन सराफे, राकेश चोपडा, संदीप ढंग, बबलू महाराज सराफे, शंकर देशमान, दीपक गाडेकर आणि गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
मलकापूर येथे पोलीस निरीक्षक भोपळे आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सौ. भारती दहिभाते, सौ. सानिका पोळ, श्री. पोळ आणि डॉ. ज्ञानेश देशपांडे यांसह अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !