बांगलादेशातील निवडणुकीच्या सर्वेक्षणात दावा
ढाका (बांगलादेश) : येत्या १२ फेब्रुवारीला बांगलादेशात संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये कट्टरतावादी आणि पाकिस्तान समर्थक ‘जमात-ए-इस्लामी’ हा देशातील दुसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तो माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएन्पी) पक्षाला कडवी टक्कर देत आहे. अमेरिकी संस्था ‘इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट’ने डिसेंबर २०२५ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात सांगितले होते की, बीएन्पीला ३३ टक्के आणि जमातला २९ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये केलेल्या एका संयुक्त सर्वेक्षणात बीएन्पीला ३४.७ टक्के आणि जमातला ३३.६ टक्के पाठिंबा मिळाला होता. हे सर्वेक्षण ‘नरेटिव्ह, प्रोजेक्शन बीडी, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड डिप्लोमसी आणि जागोरोन फाऊंडेशन’ने संयुक्तपणे केले होते.
🚨 Bangladesh Election Alert 🚨
Reports from election surveys suggest Jamaat-e-Islami, a pro-Pakistan extremist outfit, could be part of the next government 🇧🇩
⚠️ Whoever takes power now, hostility toward India and Hindus seems inevitable.
🧭 This means India must stay… pic.twitter.com/g3DqaHBoc8
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 23, 2026
जमात-ए-इस्लामीने वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता आणि पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर वर्ष १९७२ मध्ये तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी १९७५ मध्ये हटवण्यात आली आणि १९७९ मध्ये झियाउर रहमान यांच्या राजवटीत पक्षाला निवडणुकीत भाग घेण्याची अनुमती मिळाली.
तज्ञांचे मत आहे की, लोकांमध्ये मागील सरकारच्या धोरणांविषयी राग आहे, ज्याचा लाभ जमातला मिळतांना दिसत आहे. जमात पक्ष आता ‘इस्लामच उपाय आहे’ अशी घोषणा देऊन स्वतःला एक नैतिक पर्याय म्हणून सादर करत आहे.
संपादकीय भूमिका
|

पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले