नाणूस गोशाळा सप्तगोमाता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गोसेवकांचा सत्कार

वाळपई, २१ जानेवारी (वार्ता.) – गोमातेची सेवा करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे वक्तव्य राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांत संचालक राजेंद्र भोबे यांनी केले. नाणूस वाळपई येथे गोशाळा सप्तगोमाता मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जय श्रीराम संवर्धन केंद्राचे अध्यक्ष हनुमंत परब, आनंद मयेकर, शिवानंद खेडेकर, जयंत मिरींगकर, गुरुदास वझे, सिद्धेश्वरनाथ मिश्रा, डॉ. रघुनाथ धुरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी राजेंद्र भोबे म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सहस्रो वर्षांपासूनची आपली परंपरा टिकवायची असेल, तर गायीचे संगोपन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. ही गोशाळा वर्ष २००८ पासून आर्थिक पाठबळ नसतांना अखंडपणे कार्यरत आहे. यासाठी संचालक मंडळ घेत असलेले परिश्रम वाखाणण्यासारखे आहेत. सध्याचे सरकार गायीच्या चारा-पाण्यासाठी आर्थिक सहकार्य देते, त्यामुळे थोडीतरी आर्थिक स्थिरता आली आहे.’’
हनुमंत परब यांनी प्रास्ताविकपर केलेल्या भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. डॉ. रघुनाथ धुरी यांनी अहवाल वाचन केले. या कार्यक्रमात गोसेवेसाठी विशेष योगदान देणार्या गोसेवकांचा सत्कार करण्यात आला. हितेश्री परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सिद्धेश्वरनाथ मिश्रा यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !