नेतृत्व गुण असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची ठाणे येथील कु. नम्रता योगेश कुलकर्णी (वय १२ वर्षे) !

नम्रता मला म्हणाली, ‘‘आई, बाबांनी न्यूनपणा घेऊन तुझी क्षमा मागितली आहे. आता तूही न्यूनता घे.’’ असे सांगून तिने मला न्यूनता घेण्याची जाणीव करून दिली.

समंजस आणि सेवेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. सान्वी लोटलीकर (वय ९ वर्षे) !

तिला मंदिरे आणि आश्रम येथे असलेला महाप्रसाद पुष्कळ आवडतो. तिची घरी केलेल्या जेवणात आवड-नावड असते; मात्र आश्रमात जो महाप्रसाद असेल, तो ती ग्रहण करते.

देवाची ओढ असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोपरखैरणे, नवी मुंबई येथील चि. मल्हार राहुल यादव (वय ४ वर्षे) !

चैत्र शुक्ल नवमी (१७.४.२०२४) या दिवशी चि. मल्हार राहुल यादव याचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई, आजी आणि आत्या यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुदेवांप्रती अतूट श्रद्धा आणि भाव अन् साधनेची तळमळ असणारी चोपडा, जिल्हा जळगाव येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. किमया प्रशांत पाटील (वय ४ वर्षे) !

चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी (१५.४.२०२४) या दिवशी चोपडा, जिल्हा जळगाव येथील चि. किमया पाटील हिचा चौथा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदी आणि साधना करण्याची आवड असलेली ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली नाशिक येथील कु. विभूती ज्ञानेश्वर भगुरे (वय ६ वर्षे) !

चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी (१५.४.२०२४) या दिवशी नाशिक येथील कु. विभूती ज्ञानेश्वर भगुरे हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

नम्र आणि गुरुदेवांप्रती भाव असणारी पुणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) !

ती सूक्ष्मातून गुरुदेवांशी बोलत असते. ‘प.पू. गुरुदेव तिच्याकडे बघत आहेत’, असे तिला वाटते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना तिची भावजागृती होते.

धर्माचरणाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण एकादशी (५.४.२०२४) या दिवशी मोक्षदा अमोल शिंदे हिचा ४ था वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

दैवी बालसाधिकांचे साधनेविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन !

‘बालसाधकांच्या सत्संगात सहभागी झालेल्या दैवी बालसाधिकांचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

शांत आणि प्रेमळ स्वभाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ९ वर्षे) !

आयुषला आश्रमात येण्याची अनुमती मिळाली. त्याने स्वतःची बॅग अतिशय व्यवस्थित भरली. ‘तेथे जात आहोत, तर प्रत्येक गोष्ट परिपूर्णच असायला हवी’, असे त्याला वाटत होते.

संतांचे आज्ञापालन करणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रीनिधी हरीश पिंपळे (वय ६ वर्षे) !

‘गुरुदेवा, तुम्हीच मला पाण्याची बाटली घेण्याची आठवण करा.’ तिने शाळेतून आल्यावर मला सांगितले, ‘‘मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली होती; म्हणून आज मी पाण्याची बाटली विसरले नाही.’’