उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. विभूती ज्ञानेश्वर भगुरे ही या पिढीतील एक आहे !
चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी (१५.४.२०२४) या दिवशी नाशिक येथील कु. विभूती ज्ञानेश्वर भगुरे हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. विभूती ज्ञानेश्वर भगुरे हिला सनातन परिवाराकडून ६ व्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘मला गर्भधारणेच्या दुसर्या आणि तिसर्या मासात ‘श्रीरामरक्षास्तोत्र’ अन् ‘श्री कालभैरवाष्टक’ वाचावे’, अशी तीव्र इच्छा होत असे. तेव्हा मी सातत्याने या स्तोत्रांचे वाचन केले.
१ आ. नामजप करत असतांना प.पू. गुरुदेव डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात सनातनच्या अनेक संतांचे चेहरे दिसणे : मला आठवा मास चालू असतांना मी श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे छायाचित्र यांसमोर बसून नामजप करत असे. तेव्हा मला प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रात सनातनच्या अनेक संतांचे चेहरे दिसत होते. मला ही अनुभूती ग्रहणाच्या दिवशी ५ – ६ वेळा आली. त्यानंतरही मला अशी अनुभूती अनेकदा आली.
१ इ. आश्रमात जाण्याची इच्छा होणे : मला सातव्या मासात आश्रमात जाण्याची इच्छा झाली. तेव्हा यजमानांनी मला चांदवड तालुक्यातील पराशरऋषींच्या आश्रमात नेले. त्या परिसरामध्ये शांततेची अनुभूती येत होती. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही ओझरच्या जनार्दनस्वामींच्या आश्रमात गेलो. संतदर्शनामुळे माझी भावजागृती होऊन मला पुष्कळ आनंद झाला.
२. वय – ३ मास ते १ वर्ष
अ. विभूतीच्या वेळी शस्त्रकर्म करावे लागले. तिसर्या मासापासूनच कु. विभूती श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघून पुष्कळ आनंदी होत असे, तसेच ती घरात बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीकडे पाहून हावभाव करत असे. यावरून ‘ती श्रीकृष्ण आणि गणपति यांच्याशी बोलत आहे’, असे मला वाटायचे.
आ. ती ६ मासांची असतांना आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. नाशिक ते गोवा एवढ्या लांबच्या प्रवासात ती मुळीच रडली नाही किंवा तिने कोणताही त्रास दिला नाही.
इ. ती १० मासांची असतांना टाळ्या वाजवायची. तेव्हा आम्ही तिला ‘विठ्ठल विठ्ठल’ असे म्हटल्यावर ती आणखी आनंदी होऊन जोरजोरात टाळ्या वाजवत असे.’
– सौ. सविता ज्ञानेश्वर भगुरे (विभूतीची आई), नाशिक
३. वय – १ ते २ वर्षे
अ. ‘विभूती लहानपणापासून अगदी शांत आहे. ती लहानपणी रुग्णाईत असतांनाही रडत नसे. तेव्हा ‘देव तिला शक्ती देत आहे आणि ती शांतपणे नामजप करत आहे’, असे मला वाटायचे.
आ. विभूती बोलायला लागल्यावर थोड्याच दिवसांत ‘शुभम् करोति’ म्हणायला लागली. त्या वेळी ‘देवच तिच्याकडून हे म्हणवून घेत आहे’, असे मला वाटायचे. शाळेत जातांना ती आईने शिकवल्याप्रमाणे श्रीकृष्णाला प्रार्थना करूनच शाळेत जाते. तिला भजन म्हणणे आणि मंदिरात जाणे आवडते. ती मंदिरात गेल्यावर शांतपणे दर्शन घेते.’
– सौ. ज्योती संदीप भगुरे (विभूतीची काकू ), नाशिक
४. वय २ ते ३ वर्षे
अ. ‘ती घरामध्ये सर्वांशी प्रेमाने वागते. कुणी उशिरा येणार असेल, तर ती त्यांची विचारपूस करते.
आ. तिचा चेहरा नेहमी आनंदी दिसतो.’
– सौ. ज्योती संदीप भगुरे
५. वय ३ ते ५ वर्षे
५ अ. साधनेची आवड असणे
१. नामजप करणे : ‘विभूतीला नामजप करायला आवडते. ती श्रीकृष्ण आणि दत्त यांचा नामजप आवडीने करते. कधी कधी ती स्वतःहून माळ हातात घेऊन नामजप करायला बसते. ती नामजप करून नाशिक येथील संबंधित साधिकेला त्याविषयी आढावा देत असे.
२. ग्रंथांची आवड : तिला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवन दर्शन’ हा ग्रंथ बघायला पुष्कळ आवडतो. तिला अजून मराठी वाचता येत नाही. ती एकटी असतांना त्या ग्रंथातील माहितीवर बोट ठेवून वाचनाची कृती करत असे.
३. श्लोक आणि भजने म्हणण्याची आवड : विभूतीला लहानपणापासूनच अनेक छोटे छोटे श्लोक म्हणता येतात, उदा. ‘वक्रतुंड महाकाय, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, सर्व मंगल मांगल्ये…।’ तिला ‘श्रीमन् नारायण नारायण हरि हरि’ हे भजन आवडते. ती सतत श्रीकृष्णाची गाणी गुणगुणत असते.
४. रुग्णाईत असूनही आरती ऐकूनच झोपणे : वर्ष २०२३ मधील रक्षाबंधनानंतर विभूती हिवतापाने रुग्णाईत होती. एकदा घरी देवघरात आरती चालू असतांना ती अंगात ताप असूनही टाळ्या वाजवू लागली आणि ‘आरतीसाठी जायचे आहे’, असे सांगू लागली. आम्ही तिला सनातन चैतन्यवाणी ॲपवरील आरती ऐकवल्यावर ती शांत झोपली.
५ आ. तिला परकर-पोलके घालायला आवडते.
५ इ. लहानपणापासून ते आतापर्यंत तिने कधीही विशेष असा हट्ट केला नाही. कुटुंबातील व्यक्तींनी दिलेली वस्तू ती आनंदाने घेते.
५ ई. प्रवासात असतांना मंदिर, मंदिराचा कळस किंवा भगवा झेंडा दिसल्यावर ती आम्हाला आनंदाने दाखवते.
५ ए. सेवा करण्यासाठी आईला बाहेरगावी जाऊ देणे : मला सत्संग किंवा शिबिर यांसाठी १ – २ दिवसांसाठी नाशिकला जावे लागते. तेव्हा ‘सत्संगासाठी सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी बोलावले आहे’, असे तिला सांगितल्यावर ती लगेच मला जायला सांगते. मी सेवेला जातांना ती कधीही माझ्या मागे लागत नाही किंवा ‘जाऊ नको’, असे म्हणत नाही. ती मला म्हणते, ‘‘आम्ही घरी खेळू, तू चांगली सेवा करून ये.’’
५ ऐ. विभूतीला श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज, गुरुदेव आणि सद्गुरु जाधवकाका यांच्याविषयी पुष्कळ जवळीक वाटते.
५ ओ. तिला प.पू. भक्तराज महाराज आण गुरुदेव यांचे छायाचित्र असलेले पदक (लॉकेट) घालायला आवडते.’
– सौ. सविता ज्ञानेश्वर भगुरे
५ औ. ‘ती पुष्कळ धाडसी असून घडलेल्या प्रसंगांमध्ये स्थिर रहाते.’ – सौ. ज्योती संदीप भगुरे
गुरुमाऊलींच्या कृपेने मला विभूतीची गुणवैशिष्ट्ये लिहिण्याची संधी मिळाली. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सविता ज्ञानेश्वर भगुरे (विभूतीची आई), नाशिक (१७.११.२०२३)
|