स्वामी विवेकानंद यांचे कर्माविषयीचे विचार
निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.
निरंतर कर्म करा; पण बंधनात पडू नका. ध्यानात असू द्या की, बंधन फार भयंकर असते.
अशुद्ध विचार वा अशुद्ध कल्पना ही अशुद्ध कर्माएवढीच वाईट आहे. आपल्या इच्छेवर जर आपले प्रभुत्व असेल, तर त्यापासून नेहमी सर्वाेच्च फळाचीच प्राप्ती होईल.
जे काही प्रगतीत अडथळा निर्माण करते वा जे काही अधःपतनाला साहाय्य करते, तो अधर्म आणि जे काही आपल्याला उन्नत होण्यास अन् आपल्या व्यक्तीत्त्वाच्या विभिन्न अंगामध्ये सुसंवाद निर्माण करण्यास साहाय्य करते, तो धर्म होय.
ज्याने आत्मसंयमाचा अभ्यास केलेला आहे, तो बाहेरील कोणत्याही गोष्टीने विचलित होऊ शकत नाही, तो कोणत्याही गोष्टीचा गुलाम बनत नाही…
हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्खही ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धीमान तोच की, जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. कोणतेही कार्य क्षुद्र नाही, हे ध्यानात ठेवा.
जीवात्म्याचे निवासस्थान असलेले, हे शरीर कर्म करण्याचे एक अत्यंत उपयुक्त असे साधन आहे आणि जो माणूस, हे शरीर नरकतुल्य करतो, तो अपराधी आहे, तसेच जो माणूस शरिराची हेळसांड करतो, त्याची उपेक्षा करतो, तोही दोषास पात्र आहे.
स्वामी विवेकानंद यांची शिकवण १. प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. २. मत्सर आणि अहंकार यांचा … Read more
एखाद्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, हे पाप होय. मनामध्ये पुष्कळशा गोष्टी उद्भवतील; पण त्या सर्वच व्यक्त कराल, तर हळूहळू राईचा पर्वत बनेल. तुम्ही जर क्षमा कराल आणि विसरून जाल, तर सारे काही तिथेच समाप्त होऊन जाईल.
‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.
शक्ती आणि अन्य आवश्यक गोष्टी आपोआपच प्राप्त होतील. तुम्ही कामाला लागा, म्हणजे तुम्हाला दिसून येईल की, तुमच्यात इतकी शक्ती उत्पन्न होत आहे की, ती सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. दुसर्यांसाठी केलेले अत्यंत लहानसे कामही …