स्वार्थी आणि निःस्वार्थी यांच्यातील आध्यात्मिक भेद
‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.
‘भगवंताच्या सेवकांची जे सेवा करतात, ते त्याचे सर्वश्रेष्ठ सेवक होत’, असे शास्त्रे सांगतात. निःस्वार्थपरता हीच धर्माची कसोटी होय.
शक्ती आणि अन्य आवश्यक गोष्टी आपोआपच प्राप्त होतील. तुम्ही कामाला लागा, म्हणजे तुम्हाला दिसून येईल की, तुमच्यात इतकी शक्ती उत्पन्न होत आहे की, ती सहन करणे तुम्हाला कठीण जाईल. दुसर्यांसाठी केलेले अत्यंत लहानसे कामही …
घरोघर जाऊन ईशप्राप्तीच्या ध्येयाचा प्रचार करा. त्याने तुमचे स्वतःचे भले तर होईलच; पण त्यासमवेतच तुम्ही आपल्या देशाचेही हित साधाल. आपल्या देशाच्या सर्व भावी आशा तुमच्यावरच अवलंबून आहेत.
सत्य हे असत्याहून अनंतपटींनी प्रभावशाली आहे. चांगुलपणा हा वाईटपणाहून अनंतपटींने प्रभावशाली आहे. जर सत्य आणि चांगुलपणा ही दोन्ही तुमच्या ठायी असतील, तर ती केवळ आपल्या प्रभावानेच आपला मार्ग सिद्ध करून घेतील.
पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते..
धीर व्हा, साहसी व्हा. माझ्या संतानांनी (मुलांनी) प्रथम वीर बनले पाहिजे. कोणत्याही कारणाने सत्याशी थोडीही तडजोड करू नका.
तुम्ही जन्माला आलाच आहात, तेव्हा जगात काहीतरी खूण सोडून जा किंवा काहीतरी महत्त्वाचे कार्य करून जा. नाही तर तुम्ही, वृक्ष आणि पाषाण यांत काय भेद आहे ? तीही अस्तित्वात येतात, झिजतात आणि शेवटी नष्ट होतात.
तुम्ही वस्तूतः कोण आहात ? याचे तुम्हाला ज्ञान असते, तर किती चांगले झाले असते ? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही ईश्वर आहात. जर मी तुम्हाला माणूस म्हणेन, तर ती तुमची निंदाच होईल.
सर्व दुष्कृत्यांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती, म्हणजे ही दुर्बलताच होय. ही दुर्बलताच सार्या स्वार्थपरतेचे मूळ होय. या दुर्बलतेमुळेच माणूस दुसर्यांची हानी आणि त्यांचे अनिष्ट करतो.
माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे…